२८,१०४ हजार कोटी रूपये थेट मदत, केंद्राच्या निर्णयांमुळे महाराष्ट्राला जो निधी उभारता येऊ शकतो तो १ लाख ६५ हजार कोटी रूपये आणि केंद्राच्या पॅकेजमधील ७८ हजार ५०० कोटी रूपये असे एकूण २ लाख ७१ हजार ५०० कोटी रूपयांचा लाभ महाराष्ट्राला होऊ शकतो.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्राने महाराष्ट्राला विविध मार्गांनी २८ हजार कोटी रुपयांची थेट मदत केली आहे. १ लाख ६५ हजार कोटी रुपयांपर्यंतचे आरबीआयकडून कर्ज उचलण्याची मर्यादा वाढवून दिली आहे. महाआघाडी सरकार उगाच केंद्राकडे बोट दाखवून महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची ओरड करत आहे, अशी स्पष्टोक्ती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केली. सरकार आपापसातील मतभेदांमुळे पडेल, असेही त्यांनी सूचित केले.
विडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेमधील ठळक मुद्दे असे :
आता गरज धाडसी निर्णयांची
महाराष्ट्रातील कोरोना स्थिती अतिशय वाईट आहे. रूग्णसंख्या/मृत्यू यात मोठी वाढ झाली आहे. आता चाचण्यांची संख्या अतिशय कमी करण्यात आली आहे. काल केवळ 2900 चाचण्या केल्या आहेत. आता एकूण चाचण्यांपैकी 32 टक्के रूग्ण पॉझिटिव्ह येत आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
“राहुल गांधीजी यांचे आजचे विधान तर अतिशय गंभीर आहे. स्वत:च्या जबाबदारीपासून पळणारे हे विधान आहे. त्यांच्या विधानावरून काँग्रेस पक्ष आपली जबाबदारी झटकून संपूर्ण दोष मुख्यमंत्र्यांवर आणि शिवसेनेवर ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत.”
राज्य सरकारमध्ये समन्वय नाही. या काळात खर्च कशावर झाला, हे पाहिले तर या सरकारची प्राथमिकता काय आहे, हे सहज लक्षात येईल, असे सांगून फडणवीस म्हणाले, “सध्या लढाई कोरोनाविरूद्ध आहे. सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वत:च्या अंतर्विरोधातून पडेल. सध्या कोरोनाच्या लढाईतून लक्ष विचलित करण्यासाठी, माध्यमांचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी अशा बातम्या दिल्या जात आहेत.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App