नाशिक : शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या तोंडून आज “राजकीय सत्य” बाहेर पडले. त्यांनी अभिजीत दिपके याने सुरू केलेले आंदोलन सगळ्या विरोधी पक्षांनी ताब्यात घ्यायची भाषा केली. त्यामुळे सगळे विरोधी पक्ष अभिजीत दिपके याच्यामागे फरफटत गेल्याचे राजकीय वास्तव सगळ्यांच्या समोर आले.
संजय राऊत यांनी त्यांच्या आजच्या नियमित पत्रकार परिषदेत अभिजीत दिपके याचे आंदोलनाचे श्रेय नाकारले. सगळे विरोधी पक्ष त्या आंदोलनात सामील झाल्याने ते आंदोलन यशस्वी झाले, असा दावा त्यांनी केला. कुणी अमेरिकेतून आले म्हणून आंदोलन यशस्वी होत नाही, असा टोमणा सुद्धा त्यांनी अभिजीत दिपके याला मारला. त्यांनी दिल्लीतल्या लाठीचार्जची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. विरोधकांना अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या शेपटाला लटकावे लागले, हे सत्य मात्र संजय राऊत यांनी कबूल केले नाही.
दिपकेमुळे नाही, तर विरोधकांमुळे आंदोलन यशस्वी
सोमवारी जंतरमंतर आणि त्यानंतर संसद भवनाच्या परिसरात झालेल्या आंदोलनात विरोधी पक्ष कुठेच दिसला नसल्याचा प्रश्न राऊतांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना विरोधी पक्ष या आंदोलनाच्या पाठिशी आहे म्हणून हे आंदोलन यशस्वी होत असल्याचा दावा संजय राऊतांनी केला. आंदोलनासाठी आलेले लोक हे कोणत्याही एका व्यक्तीच्या मागे नाहीत. मग सोनम वांगचुक असोत किंवा अभिजित दिपके असोत. हा मुद्दा राहुल गांधींनी, आम्ही सगळ्यांनी उचलला. त्यातून ही लढाई सुरू झाली. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी त्या लढाईत तेल ओतण्याचे काम केले. प्रत्येक राजकीय पक्ष नीट पेपरफुटीवर रस्त्यावर उतरला, असा दावा संजय राऊत यांनी केला.
आमच्यामुळेच आंदोलन यशस्वी
दरम्यान, विरोधकांमुळेच आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा संजय राऊतांनी यावेळी केला. अमेरिकेतून कुणी आले म्हणून आंदोलने यशस्वी होत नाहीत. आम्ही सगळे त्या आंदोलनाच्या पाठिशी आहोत म्हणून ते आंदोलन यशस्वी होत आहे. काल अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे नेते, भीम आर्मीचे नेते, आमचे लोक आंदोलनात होते. आम्ही सातत्याने त्या आंदोलनाच्या पाठिशी आहोत. काल उद्धव ठाकरेंनी किमान २५ वेळा यावर त्यांच्याशी चर्चा केली आहे, असे ते म्हणाले.
२० जुलै हा डरपोक दिवस म्हणून साजरा करा
संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकास्र सोडलं. देशाच्या युवा शक्तीने ज्या पद्धतीने संताप व्यक्त केला, त्याला आम्ही लोकशाही मानतो. नरेंद्र मोदी, अमित शाहांच्या पोलिसांनी त्या मुलांवर ज्या प्रकारे लाठीहल्ला केला, आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली. मोदींना मुलंबाळं नसल्यामुळे किंवा असले तरी परदेशात असल्यामुळे त्यांना आमच्या भारतातल्या मुलांचं दु:ख कळणार नाही. कालचा दिवस हा भारतीय लोकशाहीतला काळा दिवस होता. २० जुलै हा दिवस यापुढे डरपोक दिवस म्हणून साजरा करावा, असा टोला राऊतांनी हाणला.
आता विरोधी पक्षांनी हे आंदोलन ताब्यात घ्यायला हवे. आम्ही जिथे संधी मिळेल तिथे आंदोलनाला समर्थन देत आहेत. आता हे आंदोलन देशपातळीवर घेऊन जावे लागेल, असेही संजय राऊत म्हणाले.
आंदोलनाच्या शेपटाला लटकले विरोधक
पण विरोधकांकडे मोदी सरकारला घेरण्यासाठी स्वतःचे खरे मुद्दे नव्हते. विरोधकांचे अनेक पक्ष फुटले, तरी मोदी सरकारला परिणामकारकरीत्या अटकाव करता येतील, असे मुद्दे विरोधी पक्षांचे नेते काढू शकले नव्हते. सध्याच्या विरोधी पक्षांकडे विश्वासार्ह नेतृत्व नसल्याने मोदी सरकारला खऱ्या अर्थाने राजकीय दृष्ट्या जेरीस आणता येत नाही म्हणूनच विरोधकांना अभिजीत दिपके याच्या CJP आंदोलनाच्या शेपटाला लटकावे लागले, असे मात्र संजय राऊत म्हणाले नाहीत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App