Navnath Ban : राऊतांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली; त्यांना हत्या, बलात्कारासारखे शब्द वापरण्याचा अधिकार नाही- नवनाथ बन

Navnath Ban

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Navnath Ban संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मूळ विचारांशी आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेशी गद्दारी केली आहे. त्यामुळे हत्या आणि बलात्कारासारखे शब्द वापरण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. विचारांची हत्या आणि पक्ष संपवण्याचं काम राऊत यांनी केले असा आरोप भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. तर राहुल गांधींची गुलामगिरी करण्यापलीकडे राऊतांकडे दुसरं कोणतंही काम उरलेलं नाही.Navnath Ban

नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी आचार्य अत्रे यांचं नाव घेण्यापूर्वी त्यांच्या कार्याचा अभ्यास करावा. आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिला, तर राऊत यांनी शिवसेना आणि हिंदुत्वाच्या विचारांची हानी केली आहे. 2019 मध्ये महायुतीच्या नावाने निवडणूक लढवून नंतर काँग्रेससोबत जाणं हीच खरी गद्दारी होती. तर माणसं पैशाने विकत घेता येत नाहीत, त्यासाठी प्रेम आणि आपुलकी लागते, असे म्हणत राऊतांवर निशाणा साधला.Navnath Ban



रामरक्षेचे श्लोकही म्हणता आले नाहीत

नवनाथ बन म्हणाले की, नागपूर दौऱ्यावर गेलेल्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमीवर जाऊन हिंदुत्वाशी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी केलेल्या गद्दारीबद्दल माफी मागायला हवी होती. रामरक्षा आंदोलनाच्या नावाखाली पक्षरक्षणाचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना रामरक्षेचे श्लोकही व्यवस्थित म्हणता आले नाहीत, मग प्रभू रामचंद्रांच्या नावाने आंदोलन करण्याचा अधिकार कसा? असा सवाल बन यांनी केला आहे. तर रामलल्लाच्या चरणी जाऊन माफी मागितल्याशिवाय त्यांच्या पक्षाचं रक्षण होणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

राऊतांनी शहांवर टीका करू नये

नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेसच्या दावणीला स्वतःचा पक्ष बांधणाऱ्या संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करू नये. राहुल गांधींच्या सूचनेनुसार राजकारण करणाऱ्या राऊतांनी देशभक्तीवर भाष्य करणं हास्यास्पद आहे.अमित शहा हे देशभक्त नेतृत्व असून महाराष्ट्र आणि देशातील जनतेला त्यांच्यावर विश्वास आहे.

वांगचुक यांच्यावरील कारवाई हायकोर्टाच्या निर्देशानुसार

नवनाथ बन म्हणाले की, सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाई ही हायकोर्टाच्या निर्देशानुसार झाली आहे.20 दिवसांच्या उपोषणामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी कारवाई केली. हुकूमशाहीबाबत बोलणाऱ्या संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील कंगना राणावत प्रकरण, नारायण राणे यांची अटक आणि भाजप कार्यकर्त्यांवरील कारवाई आठवावी, असा टोला बन यांनी लगावला आहे. महायुतीचा कारभार लोकशाही पद्धतीने चालतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी जनतेचा ठाम पाठिंबा आहे.

Sanjay Raut Betrayed Balasaheb’s Ideology: BJP Leader Navnath Ban

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात