ममता बॅनर्जींच्या पक्षाचा पडला तिसरा तुकडा; राज्यसभेच्या तीन खासदारांनी केला भाजपमध्ये घरोबा!!

वृत्तसंस्था

कोलकाता : ममता बॅनर्जींच्या पक्षाचा पडला तिसरा तुकडा; राज्यसभेच्या खासदारांनी केला भाजपमध्ये घरोबा!!, असे चित्र आज पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्यामध्ये दिसले. TMC Rajya Sabha MP

ममता बॅनर्जींची सत्ता गेल्यानंतर आधी त्यांच्या पक्षाचे म्हणजेच तृणमूळ काँग्रेसचे दोन तुकडे पडले होते. त्यापैकी लोकसभेतल्या 19 खासदारांचा एक गट पक्षातून बाहेर पडून नॅशनॅलिस्ट सिटिझन्स पार्टी मध्ये सामील झाला होता. 80 पैकी 59 आमदारांच्या गटाने मूळ तृणमूळ काँग्रेस वरच दावा सांगितला. त्यांच्यापाठोपाठ राज्यसभेतल्या तीन खासदारांनी आज भाजपमध्ये घरोबा केला. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या पक्षाचा तिसरा तुकडा पडला.

जनतेकडून अंडी फेक

ममता बॅनर्जींची सत्ता गेल्यानंतर त्यांच्याबरोबर उरलेल्या आमदार, खासदारांवर पश्चिम बंगाल मधल्या जनतेने अंडी फेकली. खुद्द ममता बॅनर्जींच्या कालच्या रॅलीवर सुद्धा अंडी फेक झाली होती. ममता बॅनर्जी यांनी भाजपशी लढण्याचा पवित्रा घेतला, पण लोकांच्या अंडी फेकी पासून त्या स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांना वाचवू शकल्या नाहीत.

राज्यसभेच्या तीन खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाची ही अक्षमता लक्षात येताच तृणमूळ काँग्रेसच्या राज्यसभेच्या तीन खासदारांनी भाजपची वाट धरली. यामध्ये सुश्मिता देव, प्रकाश चिक बरैक आणि सुखेंदू शेखर रॉय यांचा समावेश राहिला. पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार समिक भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत या तिन्ही खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Former TMC Rajya Sabha MPs join the BJP, in the presence of State BJP president Samik Bhattacharya

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात