विशेष प्रतिनिधी
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणाचा निकाल जाहीर झाला आहे. आरोपी भीमराव कांबळेला दोषी असल्याचा निकाल न्यायाधीशांनी दिला, पण अंतिम निकाल 29 जून रोजी सोमवारी जाहीर केली जाणार आहे. न्यायधीशांनी आरोपीला दोषी ठरविले. तुझ्या विरोधातले सर्व आरोप सिद्ध झाले आहेत, असे सांगितले . या गुन्ह्यातील सर्व साक्षी पुरावे तपासले असून गुन्हा सिद्ध होतोय, असं न्यायाधीक्ष एस. आर. साळुंखे म्हणाले. यापूर्वीही या आरोपी ने असे गुन्हे केले असल्याने हा आरोपी सुधारण्याच्या पलिकडे गेला आहे, असं देखील न्यायाधीशांनी नमूद केले. त्यामुळे त्याला फाशी हीच शिक्षा लागू होते असं म्हटलं आहे. आरोपीच्या दाव्यावर आम्ही विश्वास ठेऊ शकत नाही, असं म्हणत कोर्टाचे महत्वाचे निरिक्षण समोर आले. Nasrapur minor rape case
1 मे रोजी पुण्यातील नसरापूर येथे आजोळी राहायला आलेल्या साडे तीन वर्षांच्या चिमुकलीला वासरु दाखवतोच्या बहाण्याने नराधम गोठ्यात घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला. यावर तो थांबला नाही तर मुलीची ओळख पटू नये म्हणून तिची निर्घृण हत्या केली. या प्रकरणानंतर संतापाची लाट उसळली होती.
1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास अवघ्या 16 दिवसांत पूर्ण करून 1200 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. 55 साक्षीदार, डीएनए, सीसीटीव्ही व वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे सुनावणी पूर्ण झाली. अवघ्या दोन महिन्यांत निकालाच्या टप्प्यावर पोहोचलेला हा राज्यातील सर्वांत जलदगती खटल्यांपैकी एक ठरला आहे. कोर्टाने निकाल जाहीर करण्यापूर्वी आरोपीला निकाल सांगितला. यावर त्याची प्रतिक्रिया देखील घेतली.
– भीमराव कांबळेचा गुन्हेगारी इतिहास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भीमराव कांबळे हा मूळचा वेगळ्या गावचा असून त्याने कुटुंबाशी संबंध तुटल्याने नसरापुरात मोलमजुरी सुरू केली होती.धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीवर 1998 आणि 2015 मध्येही लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले होते. मात्र, आधीच्या प्रकरणांमध्ये पुरावे अभावी त्याची सुटका झाली होती, ज्यामुळे नागरिकांमध्ये मोठा रोष होता.
– 16 दिवसांत 1200 पाणी दोषारोपपत्र दाखल
तपास अधिकारी असलेल्या विजयमाला पवार यांनी अवघ्या १६ दिवसांत तपास पूर्ण करून 1200 पाणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं . या कालावधीत 55 पेक्षा अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले आणि साक्षीपुरावे गोळा करण्यात आले. 21 मे पासून प्रत्यक्ष खटल्याला सुरुवात झाली आणि 20 जूनला खटल्याची सुनावणी पूर्ण झाली . 25 जूनला विशेष न्यायाधीश एस . आर . साळुंके या हत्या प्रकरणाचा निकाल दिला. पीडितेच्या नातेवाईकांना म्हणजे आई, वडील आणि दोन्ही आजींना आत सोडण्यात आले. पण भीमराव कांबळेचा एकही नातेवाईक न्यायालयात हजर नव्हता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App