सगळीकडून फटके मिळाल्यानंतर राहुल नार्वेकर सुधारले; विधानसभेत दिलगिरी व्यक्त करते झाले!!

Rahul Narwekar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सगळीकडून फटके मिळाल्यानंतर राहुल नार्वेकर सुधारले. विधानसभेत दिलगिरी व्यक्त करते झाले!!

महान गायिका आशा भोसले यांच्या संदर्भात शोक प्रस्ताव वाचताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अनेक चुका केल्या. साधे मराठी शब्द सुद्धा त्यांना नीट वाचता आले नाही. त्यांनी अशा भोसले यांच्या वडिलांचे नाव दीनानाथ यांच्या ऐवजी दीनदयाळ असे घेतले. दुर्दम्य इच्छाशक्ती या शब्दाचा उच्चार सुद्धा चुकीचा केला. इतकेच काय पण “आशा” या शब्दाचा उच्चार “अशा” असा केला. विधानसभेने शोक प्रस्ताव मंजूर केला.



पण विधानसभेचे ते कामकाज लाईव्ह असल्याने सगळ्या महाराष्ट्राला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या चुका ऐकू आल्या. त्यामुळे महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राज ठाकरे यांच्यापासून अनेक नेत्यांनी राहुल नार्वेकरांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाचे आणि उच्चाराचे वाभाडे काढले. सोशल मीडियावर राहुल नार्वेकर प्रचंड ट्रोल झाले. राहुल नार्वेकर उच्चशिक्षित आहेत. ते वकील आहेत,

पण त्यांना साध्या मराठी शब्दांचे उच्चार नीट करता येऊ नयेत, याविषयी सगळ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. पण राहुल नार्वेकरांनी कालच आपल्या चुका सुधारल्या नाहीत. त्यांनी काल दिलगिरी व्यक्त केली नाही.

पण प्रचंड ट्रोल झाल्यानंतर राहुल नार्वेकर यांना आज उपरती झाली आणि त्यांनी आपल्या चुकीच्या मराठी उच्चारांबद्दल विधानसभेत दिलगिरी व्यक्त केली.

Rahul Narwekar mended his ways after facing flak from all quarters.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात