Trump : इराण दररोज 20 लाख बॅरलतेल विकणार, होर्मुझ उघडणार, पहिल्या फेरीतील चर्चेनंतर ट्रम्प यांची ऑफर

Trump

वृत्तसंस्था

तेहरान :Trump  इराणला युद्ध थांबवण्यासाठी तयार करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी ऑफर दिली आहे. स्वित्झर्लंडमध्ये सोमवारी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी इराणवरील निर्बंध हटवून जगभरात तेल विक्रीस मंजुरी दिली आहे. व्हेन्स म्हणाले, इराणद्वारे होर्मुझ उघडण्याच्या व त्यांच्या अणू केंद्रांच्या तपासणीस परवानगी देण्याच्या बदल्यात ही ऑफर दिली. ग्लोबल ऑइल ट्रॅकरच्या माहितीनुसार इराण आता दररोज सुमारे २० लाख बॅरल तेल विकू शकणार आहेTrump

पहिल्या फेरीतील चर्चा यशस्वी झाल्याचे सांगत व्हेन्स म्हणाले, येत्या ३० दिवसांत अमेरिका, युरोप व पश्चिम आशियातील इराणची मालमत्ता डीफ्रीझ केली जाऊ शकते. परंतु त्यांनी इशारा दिला की यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर इराण केवळ अमेरिकन सोयाबीन व मका खरेदीसाठीच करू शकेल. इराणी संसदेचे अध्यक्ष कालिबाफ म्हणाले, होर्मुझमधून वाहतूक सामान्य होईलTrump



कमाल पाशा, प्राध्यापक, गल्फ स्टडी सेंटर, दुबई (यूएई)

दुबई | कतारच्या रास लफ्फान इंडस्ट्रियल सिटी येथील बरझान गॅस पुरवठा प्रकल्पात कामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत आग लागली. कतारच्या ऊर्जा मंत्रालयानुसार, या दुर्घटनेत भारतीय व पाक वंशाच्या १३ जणांचा मृत्यू झाला. ६६ लोक जखमी आहेत. मृतांमध्ये किती भारतीय आहेत, हे स्पष्ट नाही. भारतीय दूतावास कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. हेल्पलाइन क्र. +९७४-५५६४७५०२ आणि +९७५-५५३८४६८३ जारी करण्यात आले आहेत.

कतार गॅस प्रकल्पात स्फोट, १३ जणांचा मृत्यू

कीव्ह/मॉस्को | रशिया-युक्रेन युद्ध अधिक भडकले आहे. युक्रेनने मॉस्कोजवळील रशियन स्पेस कम्युनिकेशन सेंटर आणि व्होरोनेझ शहरातील एका महत्त्वाच्या सेमीकंडक्टर प्लांटवर मोठा हल्ला केला आहे. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामुळे स्पेस सेंटरचे मोठे नुकसान झाले आहे. या सेंटरचा वापर मिलिटरी कम्युनिकेशन आणि सॅटेलाईट नेटवर्कशी संबंधित कामांसाठी केला जातो. तर व्होरोनेझचा सेमीकंडक्टर प्लँट हा रशियन सैन्यासाठी क्षेपणास्त्रे आणि इतर लष्करी इलेक्ट्रॉनिक्स बनवणाऱ्या सप्लाय चेनचा भाग आहे.

ट्रम्पसाठी इराणचा मोर्चा सोडणे गरजेचे, पण इस्रायल अजून हल्ले सुरूच ठेवणार

इराणला ट्रम्प यांच्याकडून सवलत का? ट्रम्प यांच्यासाठी इराणकडील मोर्चा सोडणे ही नामुष्की बनली आहे. होर्मुझ ही इराणची मोठी ताकद बनली आहे. अमेरिकेत ट्रम्प यांची लोकप्रियता ४५% नी घसरली. नोव्हेंबरच्या मध्यावधी निवडणुकीतील पराभव टाळण्यासाठी ते इराणला ऑफर देत राहतील.

इस्रायल हल्ले थांबवणार का?

इस्रायल लेबनॉन, पॅलेस्टाइन, येमेनमधील संघटनांवर हल्ले लगेच थांबवणार नाही.

इराण भूमिका बदलेल का?

इराणने सौदेबाजीसाठी आपली ताकद ओळखली आहे. अंतिम करारासाठी अद्याप ६० दिवसांचा वेळ आहे. त्यांना तेल विकण्याची मंजुरी मिळाली आहे. संपत्ती डीफ्रीझ करण्यासाठी ते सध्या आपली भूमिका बदलू शकतात.

दुसऱ्या फेरीची चर्चा होणार?

स्वित्झर्लंडमधील पहिल्या फेरीतील चर्चेला अमेरिका व इराणने यशस्वी म्हटले. अद्याप दुसऱ्या फेरीतील चर्चेची घोषणा केली नाही. ही चर्चा पाकिस्तानात होऊ शकते.

Trump Offers Iran 2 Million Barrels Daily Oil Export in Exchange for Peace Deal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात