विशेष प्रतिनिधी
नाशिक : विधान परिषद निवडणुकीचे निकाल कधी येतात नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे पराभूत झाले. अपक्ष उमेदवार आणि मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत जवळचे समजले जाणारे गोकुळ गीते यांचा नाशिक विधान परिषदेमध्ये विजयी झाले. गोकुळ गीते आपल्या उमेदवारीवर कायम होते.
मात्र, गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी त्यांची समजूत काढली. एकनाथ शिंदे यांनीही गोकुळ गीते यांच्यासोबत चर्चा केली. गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज शेवटपर्यंत मागे घेतला नाही. शेवटी दोन नेते घरी पोहोचल्यानंतर त्यांनी माघार घेतली आणि प्रचार करणार नसल्याचे सांगितले. मात्र, यादरम्यान छुप्प्या पद्धतीने गोकुळ गीते यांचा प्रचार सुरू होता.
आज सकाळी विधान परिषदेचा निकाल लागण्यापूर्वीच गोकुळ गीते मतमोजणी केंद्रावर पोहोचले. मी जरी प्रचार केला नसला तरीही माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला आहे, मी विजयी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे सकाळी नरेंद्र दराडे आणि गोकुळ गीते यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली होती. काही काळ तणावाचे वातावरण होते.
उदय सामंत, गिरीश महाजनांवर संताप
अखेर गोकुळ गीतेच या निवडणुकीत विजयी झाले. ज्यानंतर नरेंद्र दराडे यांनी गंभीर आरोप केले. महायुतीतील सर्व नेत्यांनी आपला घात केल्याचे त्यांनी म्हटले. एकनाथ शिंदे सोडून सर्वांनीच माझा घात केला. त्यांचा रोख उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्यावर होता. आमदार नरेंद्र दराडे यांनी थेट गोकुळ गीतेच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केला. ज्याने तणाव निर्माण झाला. मतदान केंद्रातून बाहेर पडत असताना जल्लोष करत असलेल्या गोकुळ गीतेंच्या कार्यकर्त्यांवर दराडे संतापले.
महायुतीने घात केला म्हणत गीतेंच्या कार्यकर्त्यांवर दराडे संतापले. भाजपाने सर्वाधिक मते गोकुळ गीते यांना दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. एकनाथ शिंदे यांचा मोठा गेम नाशिक विधान परिषदेमध्ये झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तीव्र नापसंती व्यक्त करून अहवाल मागविला. भाजपाकडून मागून नरेंद्र दराडे नाही, तर गोकुळ गीते यांना पाठिंबा होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App