वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आज NEET परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्ली विमानतळावरच थोडा वेळ थांबणे पसंत केले. त्यांनी दिल्ली विमानतळावरून ७, लोक कल्याण मार्ग येथे थेट जाण्यापेक्षा ते काही वेळ विमानतळावरच थांबून राहिले.NEET exam
– त्याचे झाले असे :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोलकात्यामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. त्यांच्या उपस्थितीत कोलकात्यामधल्या रेड रोडवर तब्बल 35 हजार नागरिकांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. पंतप्रधानांनी तिथे स्वतः युवकांना योग शिकवला. तिथे त्यांनी छोटेखानी भाषण सुद्धा केले.NEET exam
After arriving at Delhi Airport at 1:15 PM today, Prime Minister Narendra Modi chose to wait at the airport instead of heading directly to his residence. With the NEET examination was scheduled to begin at 2 PM, he delayed his departure to ensure students faced no inconvenience… pic.twitter.com/ioyGnJT7g6 — ANI (@ANI) June 21, 2026
After arriving at Delhi Airport at 1:15 PM today, Prime Minister Narendra Modi chose to wait at the airport instead of heading directly to his residence.
With the NEET examination was scheduled to begin at 2 PM, he delayed his departure to ensure students faced no inconvenience… pic.twitter.com/ioyGnJT7g6
— ANI (@ANI) June 21, 2026
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकात्याहून दिल्लीला आले. पण ते दिल्लीच्या विमानतळावर येतानाच १ वाजून १५ मिनिटे होऊन गेली होती. आजच नेमकी NEET परीक्षा होती. ती परीक्षा दुपारी २.०० वाजता सुरू होणार होती. त्यानुसार ती सुरू सुद्धा झाली. पण दिल्ली विमानतळावरून आपला ताफा ७, लोक कल्याण मार्गावर जाताना कदाचित परीक्षा स्थळी पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते. दिल्लीतल्या विविध मार्गांवर अनावश्यक अडथळा उत्पन्न होऊ शकतो. हे लक्षात येताच पंतप्रधानांनी विमानतळावरून थेट ७, लोक कल्याण मार्ग निवासस्थानी जायचे टाळले. त्यांनी दिल्ली विमानतळावरच काही वेळ थांबून राहणे पसंत केले. त्यामुळे पंतप्रधानांचा ताफा त्यांच्याच समवेत दिल्ली विमानतळावर राहिला. दिल्लीतल्या कुठल्याही मार्गावर अडथळा निर्माण झाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी २.०० दिल्ली विमानतळावरून ७ लोक कल्याण मार्ग आपल्या निवासस्थानाच्या दिशेने रवाना झाले
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App