वृत्तसंस्था
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेचे एकूण उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत २६.४२ टक्क्यांनी वाढले, तर जोखीम तरतुदींपूर्वीचा खर्च २७.६० टक्क्यांनी वाढला. ३१ मार्च २०२६ रोजी बँकेचा ताळेबंद २०.६१ टक्क्यांनी वाढून ९१,९७,१२१.०८ कोटी रुपये झाला.
सध्याचे स्थूल आर्थिक घटक, बँकेची आर्थिक कामगिरी आणि योग्य जोखीम बफरची देखभाल लक्षात घेऊन, केंद्रीय मंडळाने मागील वर्षातील ४४,८६१.७० कोटींच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आकस्मिक जोखीम बफर (CRB) मध्ये १,०९,३७९.६४ कोटी रुपये हस्तांतरित करण्याचा आणि CRB ला रिझर्व्ह बँकेच्या ताळेबंदाच्या आकाराच्या ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
– निधी हस्तांतराला मंजुरी
त्याचवेळी रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला विक्रमी २,८६,५८८ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी हस्तांतरित करायला मंजुरी दिली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी केंद्र सरकारला २,८६,५८८.४६ कोटी रुपयांचा प्रचंड अतिरिक्त निधी हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे.
त्यामुळे रिझर्व्ह बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे स्पष्ट झाले. या निधीमुळे केंद्र सरकारला सध्याच्या इंधन बचतीच्या काळात वित्तीय स्थिरतेशी तडजोड न करता पायाभूत सुविधा, विकास आणि कल्याणकारी कार्यक्रमांसाठी अधिक बळ मिळेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App