नाशिक : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा केंद्रीय पोलीस बलाच्या 500 कंपन्या तैनात राहतील, अशा आशयाचे ट्विट CAPF अर्थात सेंट्रल आर्म पोलीस फोर्सचे महासंचालक जी. पी. सिंग यांनी आज केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतले मतदान संपण्यापूर्वीच पश्चिम बंगाल मध्ये अत्यंत मोठ्या कारवाईचे संकेत देखील मिळाले.500 companies of Central Police Force will remain deployed in Bengal even after the elections; CAPF Director General’s tweet; Indications of major action!!
पश्चिम बंगाल मध्ये निवडणूकपूर्व हिंसा आणि निवडणुकीच्या नंतरची हिंसा लक्षात घेता केंद्र सरकारने आधीच केंद्रीय पोलीस बलाच्या 500 कंपनी राज्यात पाठवून तिथे तैनात केल्या होत्या. केंद्रीय पोलीस बलाच्या पोलिसांच्या विविध कारवायांचे हजारो व्हिडिओ व्हायरल झाले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे गुंड हिंसाचार करून सगळीच निवडणूक ताब्यात घेतात. मतदारांना आधी आणि नंतर धमकावतात, या पार्श्वभूमीवर तुम्ही मतदान करायला घाबरू नका. निवडणुकीनंतर सुद्धा केंद्रीय पोलीस बल पश्चिम बंगालमध्ये पुढचे दोन महिने तैनात राहील, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीरपणे दिले होते. अमित शाह यांच्या याच आश्वासनाची पूर्तता झाल्याचे CAPF च्या महासंचालकांच्या ट्विट मुळे स्पष्ट झाले. पुढचे आदेश मिळेपर्यंत केंद्रीय पोलीस बलाच्या 500 कंपन्या बंगालमध्ये तैनात राहतील, असे त्यांनी नमूद केले आहे.
– काँग्रेसची ममता विरोधी प्रतिक्रिया
केंद्रीय पोलीस आणि केंद्रीय राखीव दलांच्या तैनातीमुळे पश्चिम बंगाल मधले मतदान आधीच्या मतदानाच्या तुलनेत शांततेत पार पडले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी सुद्धा व्यक्त केली होती. ममता बॅनर्जी आज दिवसभर अत्यंत अस्वस्थ होऊन भवानीपूर विधानसभा मतदारसंघात फिरत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले होते. ममता बॅनर्जी यांना आता विजयाची खात्री राहिली नाही म्हणूनच त्या अस्वस्थ होऊन दिवसभर फिरत होत्या, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले.
– गुंडगिरीच्या सफाईसाठी आवश्यकता
या पार्श्वभूमीवर, CAPF च्या महासंचालकांनी केलेल्या ट्विटला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर कुठलेही सरकार सत्तेवर आले, तरी केंद्रीय पोलीस बल राज्यामधून लगेच हलणार नाही. त्यामुळे नागरिकांना सुरक्षिततेची खात्री मिळेल. त्यातही भाजपचे सरकार आले, तर राज्यातल्या गुंडगिरीची तातडीची सफाई सुरू होईल, पण पुन्हा ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसचे सरकार आले, तर नव्याने हिंसाचार होईल. त्या हिंसाचाराला अटकाव करण्यासाठी सुद्धा केंद्रीय पोलीस बलाचा उपयोग होईल. केंद्रीय पोलीस बल नागरिकांचा बचावच करेल. शिवाय पश्चिम बंगाल मध्ये ममतांच्या कृपेने घुसलेल्या बांगलादेशी घुसखोरांचा पुरता बंदोबस्त करून त्यांना हाकलून देण्यासाठी सुद्धा केंद्रीय पोलीस बलाचा वापर केला जाईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App