विशेष प्रतिनिधी
बारामती : Sunetra Pawar उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. सोमवार, ६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आपला अर्ज दाखल करणार आहेत. एकीकडे महायुती ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे काँग्रेसने अॅड. आकाश विश्वनाथ मोरे यांना उमेदवारी जाहीर केली.Sunetra Pawar
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी रविवारी ‘सिल्व्हर ओक’ येथे शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी स्पष्ट केले की, अजितदादांच्या अपघाती निधनामुळे त्यांना श्रद्धांजली म्हणून आमचा पक्ष बारामतीची निवडणूक लढवणार नाही. “आम्ही सुरुवातीलाच हा निर्णय घेतला होता आणि त्यावर आम्ही ठाम आहोत,” असे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, राहुरी पोटनिवडणुकीबाबतही महाविकास आघाडीत चर्चा सुरू असून बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन सपकाळ आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.Sunetra Pawar Sunetra Pawar
बारामतीत शरद पवार गटाने माघार घेतली असली तरी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. काँग्रेसने रविवारी सायंकाळी अॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App