विशेष प्रतिनिधी
दिल्ली : Sonia Gandhi दिल्लीच्या सत्ताकेंद्रात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रमुख आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती काल रात्री अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत वेदना आणि श्वसनासंबंधी त्रास जाणवत असल्यामुळे 79 वर्षीय सोनिया गांधी यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली निरीक्षणात ठेवण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासन आणि पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.Sonia Gandhi
रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, छातीच्या आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. डॉक्टर अनूप बासु यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सावधगिरीचा उपाय म्हणून विविध वैद्यकीय तपासण्या केल्या जात असून पुढील काही तास निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे.Sonia Gandhi
या काळात सोनिया गांधी यांच्यासोबत त्यांचे पुत्र राहुल गांधी आणि कन्या प्रियंका गांधी वाड्रा हेही रुग्णालयात उपस्थित आहेत. कुटुंबीयांसह काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेतेही त्यांच्या प्रकृतीविषयी सातत्याने माहिती घेत असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही काळात दिल्लीतील वाढत्या वायुप्रदूषणाचा त्रास त्यांना होत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रदूषणामुळे सतत खोकल्याचा त्रास जाणवत असल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधीही जानेवारी 2026 मध्ये त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सहा दिवस सर गंगाराम रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App