विशेष प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ या स्मार्ट बसची पाहणी केली आणि त्यामधून प्रवास केला.3000 Rajmata Jijau Smart Buses inaugurated in Maharashtra; Buses equipped with CCTV cameras, GPS system and other modern facilities
महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाला आधुनिक प्रगतीची जोड देणाऱ्या या उपक्रमांतर्गत एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल 3000 अत्याधुनिक स्मार्ट बसेस दाखल होत आहेत. एसटीच्या ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘हिरकणी’ यांसारख्या गौरवशाली नामपरंपरेत आता ‘राजमाता जिजाऊ’ची अभिमानाने भर पडली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ या स्मार्ट बसची पाहणी केली व त्यामधून प्रवास केला. महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाला आधुनिक प्रगतीची जोड देणाऱ्या या उपक्रमांतर्गत एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल… pic.twitter.com/jPCtFApO25 — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 24, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ या स्मार्ट बसची पाहणी केली व त्यामधून प्रवास केला. महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाला आधुनिक प्रगतीची जोड देणाऱ्या या उपक्रमांतर्गत एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल… pic.twitter.com/jPCtFApO25
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 24, 2026
राजमाता जिजाऊ या बस मध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस सिस्टीम, पॅनिक बटन आणि इलेक्ट्रॉनिक साईनेज अशा सुविधांचा समावेश केला आहे. त्यामुळे या बस मधला प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
राजमाता जिजाऊ बसच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App