वृत्तसंस्था
तेहरान : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण वरचे हल्ले पुढचे काही दिवस स्थगित करायची घोषणा केली, पण इराणने मात्र या घोषणेवर अविश्वास दाखवून ट्रम्पनी तशी घोषणा का केली?, याची वेगळीच कारणे सांगितली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण वरचे हल्ले काही काळ स्थगित करण्याचे सूचना वजा आदेश त्यांच्या युद्ध मंत्रालयाला दिले. त्यानुसार युद्ध मंत्रालयाने इराणवरचे हल्ले काही काळ थांबविले. ट्रम्प यांनी आपल्या ट्रूथ अकाउंट वरून यासंदर्भातली घोषणा केली. अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा सुरू आहे ती चर्चा आणखी काही काळ पुढे चालू राहू शकते म्हणून मी युद्ध मंत्रालयाला इराण वरचे हल्ले पुढचे चार-पाच दिवस थांबविण्याचे आदेश दिलेत असे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ अकाउंट वर लिहिले.
– इंधनाचे दर वाढू नयेत म्हणून…
पण इराणने मात्र ट्रम्प यांच्या हल्ले स्थगित करायच्या घोषणेविषयी शंका व्यक्त केली. जागतिक पातळीवरचे इंधनाचे दर वाढून अमेरिकेला त्याचा फटका बसू नये म्हणूनच ट्रम्प यांनी इराण वरचे हल्ले थांबविण्याची घोषणा केली. इराणने प्रतिहल्ले करायच्या दिलेल्या इशाऱ्याला ट्रम्प घाबरले, असा दावा इराणी वृत्तसंस्थांनी केला. पण एकूणच इराणने ट्रम्प यांच्या घोषणेवर विश्वास ठेवायलाच नकार दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App