नाशिक : देवेंद्र फडणवीस यांनी “डाव” टाकल्यामुळे शरद पवारांना राज्यसभेची खासदारकी, पण पवारांची महाविकास आघाडीचे आमदारांसाठी डिनर डिप्लोमसी!!, असला प्रकार आज समोर आला. Sharad Pawar
वास्तविक शरद पवारांना राज्यसभेची खासदारकी बिनविरोध मिळू शकली, ती देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेला डावामुळे. देवेंद्र फडणवीस यांनीच राज्यसभेच्या निवडणुकीत महायुती आठवा उमेदवार देऊ शकते, असा “डाव” टाकून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि काँग्रेसची कोंडी केली होती. त्यामुळे या दोन्ही पक्षांना शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीच्या पाठीशी उभे राहणे भाग पडले. अन्यथा आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांच्या उमेदवारीला विरोध केलाच होता. शेवटी सुप्रिया सुळे यांना पुढाकार घेऊन उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीचे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या घराचे उंबरठे झिजवावे लागले होते. सुप्रिया सुळे यांना या दोन्ही नेत्यांच्या घरी जाऊन शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीसाठी पाठिंबा मागवा लागला होता.
– दुसरा उमेदवार पाडायचेच ठरले होते
महाविकास आघाडीने शरद पवारांच्या यांच्या ऐवजी दुसरा उमेदवार दिला असता, तर शिवसेनेकडून रोहित टिळकांना उमेदवारी देऊन राज्यसभेवर निवडून आणायचे घाटलेच होते. त्यामुळे महाविकास आघाडीत बरीच भवती न भवती होऊन शेवटी शरद पवारांना राज्यसभेची बिनविरोध खासदारकी मिळू शकली. एकेकाळी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या शरद पवारांना राज्यसभेच्या खासदारकीसाठी आपल्या मुली मार्फत धडपडाट करावा लागला होता.
– फार मोठे “चाणक्य” असल्याचा आव
पण तो धडपडाट केवळ देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या “डावामुळे” यशस्वी झाला. म्हणून मग आता शरद पवारांनी आपण फार मोठे “चाणक्य” असल्याच्या थाटात महाविकास आघाडीतल्या आमदारांना डिनर द्यायचे ठरविले असल्याची बातमी आज समोर आली. येत्या 23 मार्चला म्हणजे सोमवारी सायंकाळी 7.00 वाजता शरद पवार हे यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये महाविकास आघाडीतल्या सगळ्या आमदारांना डिनर देणार आहेत. या डिनर डिप्लोमसी मध्ये नेमकी काय चर्चा होईल??, याविषयीच्या बातम्या मराठी माध्यमांनी रंगविल्या आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या डावामुळे आपल्या अन्य उमेदवाराचा पराभव होऊ शकतो या भीतीपोटी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शरद पवारांना पाठिंबा देऊन त्यांची निवडणूक बिनविरोध केली. आता त्या नेत्यांना शरद पवारांचे डिनर गोड लागेल का??, हा सवाल मात्र कुठल्याही मराठी माध्यमाने विचारलेला नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App