Rupali Chakankar : भोंदू अशोक खरात प्रकरण भोवले, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा

Rupali Chakankar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Rupali Chakankar  नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण लागले असून, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा खरातची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ आणि त्याच्यासोबतचे काही फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या गंभीर प्रकारामुळे चाकणकर यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली होती. तसेच विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी लावून धरली होती. अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चाकणकरांनी राजीनामा दिला असल्याचे समोर आले आहे. तसेच वैयक्तिक कारणाने राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.Rupali Chakankar

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आपले पद गमवावे लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी सकाळीच त्यांना राजीनामा देण्याच्या सूचना केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार चाकणकर यांनी प्रथम महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, आता त्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा देणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.Rupali Chakankar



रुपाली चाकणकर यांनी नुकतीच पुणे डीजींची भेट घेतली होती. तसेच सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. त्यानंतर रात्री उशिरा चाकणकर यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली व या भेटीत त्यांनी राजीनामा दिला आहे.

लवकरच मी सविस्तर भूमिका मांडेल- रुपाली चाकणकर

पदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत म्हटले की, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, आमच्या नेत्या तसेच राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावाहिनींकडे माझ्याकडे असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला.सध्या विविध माध्यमातून होत असलेल्या आरोपांची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारत मी हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत योग्य तो निर्णय आदरणीय सुनेत्रावहिनी घेतील! या प्रकरणाबाबत लवकरच मी सविस्तर भूमिका मांडेल.

राजीनामा देण्याचे आदेश दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार- रोहित पवार

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, मुख्यमंत्री साहेबांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे समजत आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांचे आभार, परंतु केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही तर या प्रकरणाच्या तळाशी जाऊन पारदर्शक चौकशी करावी आणि आ. अमोल जी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या अपघाताशी या भोंदू बाबाचे कनेक्शन आहे का? याचाही तपास व्हायला हवा.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी राजीनाम्याचे आदेश द्यायला पाहिजे होते- सुषमा अंधारे

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, राजीनामाचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असतील तर स्वागतचा आहे. मात्र एक खंत आहे की हीच भूमिका राज्याचे खमके नेतृत्व म्हणून राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि या पक्षाचे अध्यक्ष सुनेत्रा वहिनींनी घेणं जास्त अपेक्षित होतं. दुर्दैवाने त्यांनी ही संधी गमावली.. असो, आमचा लढा चालूच राहील. चाकणकरांना सहआरोपी करून अटक करा.

अशोक खरातसोबतचे अनेक फोटो व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यातील जवळीक दर्शवणारे अनेक व्हिडिओ आणि फोटो सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये चाकणकर या खरातची ‘पाद्यपूजा’ करताना दिसत आहेत, तर दुसऱ्या एका प्रसंगी त्यांनी खरातची तुलना थेट ‘विठ्ठलाशी’ केल्याचे समोर आले आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीचे अशा वादग्रस्त भोंदूबाबाशी असलेले हे अतिशय घनिष्ट संबंध पाहून सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे.

केवळ वैयक्तिक संबंधच नव्हे, तर रुपाली चाकणकर या अशोक खरातने स्थापन केलेल्या ट्रस्टच्या संचालिका असल्याचेही उघड झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी एका महिलेच्या लैंगिक छळ प्रकरणात पीडितेला मदत करण्याऐवजी चाकणकर यांनी उलट खरातलाच साथ दिल्याची धक्कादायक माहिती आता समोर आले आहे.

Rupali Chakankar Resigns as Maharashtra Women’s Commission Chief VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात