बारामतीची पोटनिवडणूक : विजय वडेट्टीवारांचे “स्वतंत्र” वक्तव्य की पवारांची नेहमीची double game??

Vijay Vadettiwar

नाशिक : बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या मुद्द्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी जे वक्तव्य केले, ते पाहून ते वडेट्टीवार यांचे स्वतंत्र वक्तव्य आहे की शरद पवारांची नेहमीचीच double game आहे??, असा सवाल समोर आला.Baramati by-election: Vijay Vadettiwar’s “independent” statement or Pawar’s usual double game??

– लक्ष्मण हाकेंनी मारली पाचर

बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार याच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या म्हणजेच पर्यायाने महायुतीच्या उमेदवार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुरुवातीलाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. बारामतीतून पवार सोडून दुसरा उमेदवार द्या आम्ही तिथे निवडून येऊन दाखवतो सुनेत्रा पवारांना हवे तर विधान परिषदेवर घ्या, असे वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केले. इथेच त्यांनी सुनेत्रा पवारांच्या बिनविरोध निवडून येण्याच्या इराद्यात पहिली पाचर मारली.



काँग्रेस बारामतीत उमेदवार द्यायच्या विचारात

त्यानंतर आज विजय वडेट्टीवार यांनी एक वेगळेच वक्तव्य केले. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले असले तरी त्यांनी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांशी चर्चा केलेली नाही. त्यामुळे त्यांचे वक्तव्य काँग्रेसला मान्य नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जर बारामतीची पोटनिवडणूक लढवणार नसेल, तर काँग्रेसला तिथे उमेदवार द्यायचा विचार करावा लागेल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवर यांच्या या वक्तव्यामुळे सुनेत्रा पवारांच्या बिनविरोध निवडून येण्यामध्ये दुसरी पाचर मारली गेली.

– पवारांचे राज्यसभेचे काम झाले साध्य

एरवी शरद पवारांची राज्यसभेची निवडणूक होती, त्यावेळी काँग्रेसने नाईलाजाने का होई ना, पण शरद पवारांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा अप्रत्यक्ष दबाव कामी आला. काँग्रेसने शरद पवारांना पाठिंबा न देता जर राज्यसभेसाठी उमेदवार उभा केला असता तर देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेसाठी महायुतीच्या सातवा उमेदवार म्हणून रोहित टिळकांना उभे केले असते. राज्यसभेची निवडणूक चुरशीची करून काँग्रेसचा उमेदवार पाडला असता. पण हा धोका वेळीच ओळखून काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पाठिंबा देणे पसंत केले. यातून शरद पवारांना हवे ते स्वतःचे काम साध्य झाले.

– सुनेत्रा पवारांच्या बिनविरोध निवडीत खोडा घालायचा “डाव”

पण बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मात्र शरद पवारांच्या पक्षाने डबल गेम खेळली. एकीकडे सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीचे विलीनीकरण टाळल्याने शरद पवारांच्या पक्षातल्या नेत्यांचा तिळपापड झाला पण तो उघडपणे व्यक्त करता येत नसल्याने रोहित पवारांनी अजित पवारांचा अपघात घातपातच ठरवायचा “डाव” खेळला. त्यातून त्यांनी अगदी प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला पण शिव्या देऊन घेतल्या. पण तेवढ्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समाधान झाले नाही. म्हणून मग सुनेत्रा पवारांच्या बारामती पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून येण्यात खोडा घालायचा “डाव” सुरू झाला. यातूनच विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य समोर आले. शरद पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसला अचानक बारामतीची निवडणूक लढवायची “उबळ” आली. यामागे शरद पवारांची राजकीय फूस नसेल कशावरून??, असा सवाल या निमित्ताने समोर आला. कारण बारामतीतील निवडणूक शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या कुठल्या नेत्याला लढवता येत नसेल, तर काँग्रेसच्या नेत्याने परस्पर निवडणूक लढवून त्याला “आतून मदत” करता आली तर काय हरकत आहे?? “तशी मदत” करून सुनेत्रा पवारांना धक्का देता आला किंवा त्यांना आपल्या पायाशी आणता आले तर पाहायला काय हरकत आहे??, असा मतलबी विचार शरद पवारांच्या कंपूने केला असल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.

Baramati by-election: Vijay Vadettiwar’s “independent” statement or Pawar’s usual double game??

महत्वाच्या बातम्या


	Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात