विशेष प्रतिनिधी
मुंबई :LPG Supply केंद्र शासनाने शिल्लक व्यावसायिक गॅस वाटपाचे अधिकार राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील गरजा ओळखून प्राधान्य क्षेत्रांना पुरवठ्याची कार्यवाही जिल्हाधिकारी करणार आहेत. त्यामुळे येत्या ८ ते १० दिवसांत गॅस पुरवठा सुरळीत होईल.LPG Supply
पेट्रोल पंपांवर ६१ रुपये लिटर दराने केरोसिन (रॉकेल) वाटपाची तयारी राज्य सरकारने केली आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली. पुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष जिल्हा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.LPG Supply
केरोसिन वाटप नियमावली राज्य शासनाने जारी केली नाही
सूत्रांनुसार केरोसिन वाटपाची नियमावली शासनाने जारी केलेली नाही. त्यामुळे रेशन कार्डधारकांनाच केरोसिन मिळेल का? किती लिटर मिळेल? आठवड्यातून एकदा की दोनदा वितरण होणार? ग्रामीण भागात मिळेल की शहरी भागांमध्येही मिळणार. ही योजना किती कालावधीसाठी आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App