नाशिक : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून “डबल गेम” समोर आली. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी काल एकाच वेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली, पण ही भेट कशासाठी होती??, याची कारणे मात्र दोघांनी वेगवेगळी दिली.Double game within Sharad Pawar’s NCP
अजित पवारांच्या अपघाताचा विषय घेऊन रोहित पवारांनी दिल्लीत भेटीगाठींचा सपाटा लावला. त्यामध्ये त्यांनी अनेक प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. यामध्ये समाजवादी पार्टीचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव, समाजवादी पार्टीचे खासदार धर्मेंद्र यादव यांचा समावेश होता. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमार झा यांची भेट घेतली. या सर्व भेटींच्या वेळी त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातले शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते होते.
– फक्त खर्गेंच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे रोहितबरोबर
पण काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची रोहित पवारांनी भेट घेतली त्यावेळी मात्र सुप्रिया सुळे आवर्जून तिथे उपस्थित राहिल्या. बाकीच्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठींच्या वेळी सुप्रिया सुळे त्यांच्याबरोबर नव्हत्या. फक्त मल्लिकार्जुन खरगे यांना भेटायला त्या रोहित पवारांबरोबर गेल्या होत्या.
महाराष्ट्राशी अगदी जवळचा संबध असलेले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लीकार्जुन खर्गे साहेब यांचीही दिल्लीत भेट घेऊन अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि अजितदादांच्या अपघाताबाबत आम्ही जमा केलेल्या सर्व माहितीचं… pic.twitter.com/qcTAZFv3Ih — Rohit Pawar (@RRPSpeaks) March 9, 2026
महाराष्ट्राशी अगदी जवळचा संबध असलेले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लीकार्जुन खर्गे साहेब यांचीही दिल्लीत भेट घेऊन अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि अजितदादांच्या अपघाताबाबत आम्ही जमा केलेल्या सर्व माहितीचं… pic.twitter.com/qcTAZFv3Ih
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 9, 2026
– आत्या – भाच्याची “डबल गेम”
मात्र इथे सुद्धा सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची “डबल गेम” समोर आली. रोहित पवारांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची अजित पवारांच्या अपघाता विषयी भेट घेतल्याचे ट्विट केले तर सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांना महाविकास आघाडीने खासदारकीची संधी दिल्याबद्दल मल्लिकार्जुन खर्गे यांचे आभार मानण्यासाठी भेट घेतल्याचे ट्विट केले. सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांच्या भेटीचा किंवा अजित पवारांच्या अपघाताचा विषय सुद्धा आपल्या ट्विटमध्ये नमूद केला नाही.
Met Hon. Mallikarjun Kharge (@kharge) Ji and conveyed my sincere gratitude to him and the @INCIndia for their support to Hon. Pawar Saheb’s candidature for the Rajya Sabha election. Gratitude for the continued spirit of cooperation and solidarity.@INCMaharashtra pic.twitter.com/vLj0OVRVqd — Supriya Sule (@supriya_sule) March 9, 2026
Met Hon. Mallikarjun Kharge (@kharge) Ji and conveyed my sincere gratitude to him and the @INCIndia for their support to Hon. Pawar Saheb’s candidature for the Rajya Sabha election.
Gratitude for the continued spirit of cooperation and solidarity.@INCMaharashtra pic.twitter.com/vLj0OVRVqd
— Supriya Sule (@supriya_sule) March 9, 2026
– आभार मानायसाठी खर्गे यांच्या घरी
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा डाव खेळून अजितदादांची राष्ट्रवादी कब्जात घेण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. म्हणून मग शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या खासदारकीसाठी दिल्ली आणि मुंबईत लॉबिंग करावे लागले. शरद पवारांना मलिकार्जुन खर्गे यांना फोन करणे भाग पडले. मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहुल गांधी यांना पटवून शरद पवारांना खासदारकी मिळवून दिली. म्हणूनच सुप्रिया सुळे त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन भेटल्या. किंबहुना त्यांना मल्लिकार्जुन खर्गे यांना जाऊन भेटावे लागले.
– काँग्रेसचा दरवाजा खुला करायचा “डाव”
दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणारच नसेल, तर काँग्रेसचा दरवाजा तरी आपल्यासाठी खुला खुला ठेवण्याचा ‘डाव” सुप्रिया सुळे यांनी या भेटीतून खेळून घेतला. पण रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचा विषय काढून त्यामध्ये वेगळ्या पद्धतीने खोडा घालून ठेवला. पण काही झाले तरी दिल्लीतल्या आत्या – भाच्याच्या भेटीगाठीं मधून खुद्द शरद पवारांच्या राष्ट्रवादीतली “डबल गेम” उघड्यावर आली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App