विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनसेचा आजचा वर्धापन दिन राज ठाकरे यांनी रायगडावर जाऊन साजरा केला. आजच्याच दिवशी त्यांच्या पक्षाला मराठवाड्यातल्या एका पंचायत समितीत सत्ता मिळाली.MNS chairman with the help of BJP in the Panchayat Samiti of Gopinath Munde’s constituency Renapur
गोपीनाथ मुंडे यांच्या मतदारसंघ असलेल्या रेणापूरच्या पंचायत समितीत भाजपच्या मदतीने मनसेच्या सभापती निवडून आल्या. रेणापूर पंचायत समितीच्या एकूण आठ जागांच्या निवडणुकीत काँग्रेसला तीन भाजपला तीन तर मनसेला दोन जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मनसे कडे सत्तेचा हुकमाचा पत्ता होता.
मनसेच्या सदस्यांनी भाजपला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. पण भाजपने मात्र मनसेच्या नेत्या मोनिका सूर्यवंशी यांना सभापती म्हणून निवडून आणले. भाजपचे शरद दरेकर उपसभापती झाले. सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते त्यामुळे आपोआपच मोनिका सूर्यवंशी यांची निवडणूक बिनविरोध झाली.
– रमेश कराड यांची प्रतिष्ठा पणाला
रेणापूरच्या पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपचे आमदार रमेश कराड यांनी आपली राजकीय प्रतिष्ठान कोणाला लावली होती. पण काँग्रेसने त्यांना चांगली टक्कर देऊन तीन सदस्य निवडून आणले पण तरीसुद्धा रमेश कराड यांनी मनसे बरोबर आघाडी करून भाजप आणि मनसे यांचे सत्ता आणून ती टिकवून ठेवली.
– गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला
एकेकाळी सगळ्या महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात काँग्रेसचे संपूर्ण वर्चस्व असताना रेणापूर मधून मात्र गोपीनाथ मुंडे निवडून येत असत. रेणापूर हा मतदार संघ त्यांचा बालेकिल्लाच झाला होता. त्यामुळे रेणापूर मध्ये भाजपचे वर्चस्व असणे यात विशेष काही नव्हते पण भाजपला सहयोग केल्याने मनसेच्या नेत्याला तिथे सभापती पदाची संधी मिळाली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App