भाजपचा मराठी माध्यमांना पुन्हा चकवा; विनोद तावडे आणि रामदास आठवले यांच्यासह राज्यसभेसाठी आणली दोन सरप्राईज नावे!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भाजपने महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमांना पुन्हा एकदा चकवा दिला राज्यसभेसाठी दोन सरप्राईज नावे आणून भाजपच्या श्रेष्ठींनी मराठी माध्यमवीरांना पुन्हा एकदा तोंडावर पाडले. मराठी माध्यमांनी चर्चेत आणलेली दोनच नावे भाजपच्या यादीत दिसली. विनोद तावडे आणि रामदास आठवले यांना भाजपने महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दिली. पण मराठी माध्यमांनी चर्चेत आणलेली बाकीची नावे मात्र भाजपच्या श्रेष्ठींनी कापली त्यांच्या ऐवजी दोन सरप्राईज नावे यादीत आणली.

भाजपने राज्यसभेचे महाराष्ट्रातले चार उमेदवार आज जाहीर केले. त्यामध्ये विनोद तावडे आणि रामदास आठवले यांचा समावेश आहे. त्यांच्याबरोबरच माया चिंतामणी ईवनाते आणि रामराव वडकुते यांचा समावेश आहे.



भाजप राज्यसभेच्या उमेदवारीसाठी महिलांना प्राधान्य देणार या नावाखाली मराठी माध्यमांनी अनेक नावे चर्चेत आणली होती. त्यामध्ये पंकजा मुंडे यांची बहीण प्रीतम मुंडे यांचाही समावेश होता. त्यांच्याबरोबरच निवृत्त होणारे खासदार भागवत कराड आदींचाही समावेश होता. पण प्रत्यक्षात भाजपने यापैकी कुणालाही उमेदवारी दिली नाही. त्यांच्या ऐवजी माया चिंतामणी ईवनाते आणि रामराव वडकुते या सरप्राईज नावांना पुढे आणत राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यातून भाजपने मराठी माध्यमवीरांचा पापड पुरता मोडला.

– तावडे लवकरच केंद्रीय मंत्री

भाजपने विनोद तावडे यांना राज्यसभेवर आणल्याने त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाची शक्यता वाढली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार असून त्यामध्ये विनोद तावडे यांचा समावेश होऊ शकतो, अशी चर्चा दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात आहे. त्याचबरोबर रामदास आठवले यांचेही केंद्रीय मंत्रीपद शाबूत राहू शकते, अशी चर्चा दिल्लीतल्या वर्तुळात आहे.

BJP’s Social Engineering, Athawale, Vinod Tawde, Maya Evenate, Ramrao Vadkute get chance in Rajya Sabha nomination

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात