नाशिक : आखाती युद्धामुळे तेलाचे भाव भडकले, पण त्यामुळेच रशियाकडून तेल खरेदी करण्याचा भारताचा मार्ग सुद्धा मोकळा झाला. कारण भारतीय नागरिकांना तेलाच्या भावाची झळ पोहोचू नये म्हणून केंद्रातल्या मोदी सरकारने तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले टाकली.
अमेरिका आणि इजराइल यांनी इराणवर केलेले हल्ल्यामुळे आखातात युद्ध भडकले इराणने आखाता मधल्या सात देशांवर हल्ले केले. कुठल्याही तेलाच्या जहाजावर हल्ला करू, असा इशारा देऊन आखातामधली तेल वाहतूक बंद पाडली. त्यामुळे संपूर्ण जगभरातले तेलाचे भाव तब्बल 50 टक्क्यांनी भडकले ओमानने गॅस पाईपलाईन सुद्धा बंद केली. त्यामुळे युरोपात गॅसची टंचाई निर्माण होऊन गॅसचे भाव भडकले.
या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना तेलाचे भडकलेल्या भावाची झळ पोहोचू नये म्हणून मोदी सरकारने तीन महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये रशियाकडून तेल खरेदी पुन्हा वाढवायची त्याचबरोबर गॅसचे रेशनिंग करायचे आणि भारतातून होत असलेली तेलाची निर्यात थांबवायची, असे निर्णय घेतले.
– रशियाकडून तेल खरेदी वाढविणार
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टेरिफचा बॉम्ब टाकल्यानंतर भारताने रशियाकडून तेल घेणे पूर्ण थांबविले नव्हते, पण त्यामध्ये साधारण 50 टक्क्यांची कपात केली होती. जिथून तेल स्वस्त मिळेल तिथून आम्ही ते घेऊ, अशी भूमिका घेतली होती पण अमेरिकेच्या दबावाचा परिणाम म्हणून भारताने वेनेजुएला मधून सुद्धा तेल खरेदी सुरू केली होती, पण आखाती युद्धामुळे तेलाची वाहतूकच थांबली त्यामुळे अपरिहार्यपणे भारताला रशियाकडून तेल खरेदी वाढवायचा निर्णय घ्यावा लागला, पण याचा फायदा आणि रशिया या दोघांनाही झाला. कारण भारताला रशियाकडून अधिक स्वस्त तेल मिळेल. त्याचबरोबर रशियाला आवश्यक असणारा वित्त पुरवठा भारताकडून होईल.
– अमेरिकेची दादागिरीची क्षमता घटली
अमेरिका आणि इजरायल इराण बरोबरच्या युद्धात गुरफटले असताना ट्रम्प प्रशासन भारतावर पूर्वीसारखी दादागिरी करण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे भारताला रशियाकडून तेल खरेदी वाढवायला कुठला अडथळा येण्याची शक्यता नाही आणि तरी अडथळा आलाच, तरी तो दूर करायची क्षमता मोदी सरकारमध्ये आहे.
– भारतावर मर्यादित परिणाम
त्याचबरोबर गॅसचे रेशनिंग केल्याने गॅसचे दर वाढणार नाहीत. गॅसचा वापर नियमित आणि मर्यादितपणे करावा लागेल. त्यामुळे महागाईचा फटका सर्वसामान्य भारतीयांना कमी बसेल. भारत आयात केलेल्या तेलाच्या 25% तेल निर्यात करतो. ती निर्यात थांबली की भारतातली तेल टंचाई सुद्धा नियंत्रित राहील. त्यामुळे आखातातल्या युद्धाचा भारतावर मर्यादित परिणाम होईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App