काल सुनेत्रा पवारांच्या मोदी शाहांच्या भेटीगाठी; आज शिवसेनेचे सगळे खासदार नितीन नवीन यांच्या घरी!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिट नंतर 14 दिवसांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीत येऊन भेटीगाठी घेतल्या. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पुत्र पार्थ आणि जय पवार होते. त्यांच्या भेटीगाठींच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा मराठी माध्यमांनी रंगवली. पण सुनील तटकरे यांनी क्या चर्चेवर पाणी फेरले. सुनेत्रा पवारांच्या दिल्ली भेटीच्या वेळी रोहित पवारांनी दिल्लीत येऊन पत्रकार परिषद घेतली अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी संशयाची पेरणी केली. Shiv Sena

या राजकीय पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची शिवसेना सुद्धा भेटीगाठींमध्ये मागे राहिली नाही. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नितीन नबीन यांची आज दिल्ली येथे शिवसेनेच्या सर्व खासदारांनी सदिच्छा भेट घेतली. श्री. नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे शिवसेनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा घडून आली.



केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार मिलिंद देवरा, रवींद्र वायकर, संदीपान भुमरे, नरेश म्हस्के, राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी. यावेळी उपस्थित होत्या.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर त्यांची दिल्ली आणि मुंबईत ताकद वाढू शकते. भाजप आणि राष्ट्रवादी यांचे संबंध बळकट होऊ शकतात. त्यामुळे शिवसेनेची ताकद, गरज आणि सोय घटू शकते. या राजकीय शक्यतेची नाजूकता लक्षात घेऊनच शिवसेनेच्या खासदारांनी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेऊन आपला खुंटा बळकट केला.

All Shiv Sena MPs at Nitin Naveen’s house

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात