पुणे, सांगली, ठाणे, नागपूर आणि नाशिक या जिल्हा परिषदांना ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उत्कृष्ट कामगिरीचे पुरस्कार जाहीर

Awards announce

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातल्या विविध कार्यालयांमध्ये प्रशासकीय सुधारणा व्हाव्यात. या सुधारणांचा जनतेला लाभ व्हावा या हेतूने फडणवीस सरकारने वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये विविध उपक्रमांची स्पर्धा घेतली‌. या उपक्रमांच्या स्पर्धेचा निकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर द्वारे जाहीर केला.Awards announced for excellent performance in e-Governance improvement program to Zilla Parishads of Pune, Sangli, Thane, Nagpur and Nashik

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत कार्यालयाची वेबसाइट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉट, AI व Blockchain चा शासकीय कामकाजात वापर आणि GIS चा कामात वापर अशा 7 सर्वंकष मुद्यांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय कार्यालयांची निवड दि. २६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आली.



निवडणूक आचारसंहितेमुळे प्रलंबित ठेवलेला जिल्हा परिषद कार्यालये संवर्गाचा निकाल आज जाहीर होत आहे.

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुणे, सांगली, ठाणे, नागपूर आणि नाशिक जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या चमूंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हार्दिक अभिनंदन केले!

सर्व विजेत्यांचा लवकरच राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येईल.

Awards announced for excellent performance in e-Governance improvement program to Zilla Parishads of Pune, Sangli, Thane, Nagpur and Nashik

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात