Solapur EVM : सोलापुरात ढाब्यावर सापडलेल्या ईव्हीएमप्रकरणी आयोगाची कारवाई; राखीव ईव्हीएम मतदानातील नसल्याचा खुलासा

Solapur EVM

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Solapur EVM सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान राखीव मतदान यंत्रे सुरक्षा कक्षात वेळेत जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. ढाब्यावर ईव्हीएम आढळल्याने खळबळ उडाल्यानंतर आयोगाने हे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Solapur EVM



सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि मोहोळ येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित ईव्हीएम प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरलेली नाहीत. ती राखीव स्वरूपातील होती. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत गैरप्रकार झालेला नाही. तरीसुद्धा हे ईव्हीएम वेळेत सुरक्षा कक्षात जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे. मोहोळ तालुक्यातील २२० मतदान केंद्रांवर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदानानंतर काही राखीव मतदान यंत्रे तत्काळ सुरक्षा कक्षात जमा न झाल्याने संभ्रम निर्माण झाला. कुरूल (५५) गटातील काही मतदान केंद्रांसाठी नियुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडील ०२ कंट्रोल युनिट व ०२ बॅलेट युनिट यासंदर्भात हा प्रकार घडला.

Solapur EVM Controversy: Reserved Units Found at Dhaba, Case Filed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात