पवारांची बारामतीतून Double game; सुनेत्रा पवारांना संधी दिली, शपथविधी झाला, त्याचा आनंद; पण विलीनीकरणाच्या चर्चेत बोलायचा फडणवीसांना अधिकार नाकारला!!

नाशिक : बारामतीतल्या आजच्या पत्रकार परिषदेतून शरद पवारांनी पुन्हा एकदा double game खेळली. सुनेत्रा पवारांना संधी दिली. त्यांचा शपथविधी झाला, याचा पवारांना आनंद झाला. पण दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चेत मात्र देवेंद्र फडणवीस यांना बोलायचा अधिकार नाही, असा दावा शरद पवारांनी केला. Sharad Pawar

शरद पवारांनी दोनच दिवसांपूर्वी बारामती पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी सुनेत्रा पवारांच्या शपथविधी बद्दल आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगून त्यांनी कानावर हात ठेवले होते. त्यामुळे शरद पवारांना न सांगताच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याची वातावरण निर्मिती झाली होती. त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण हाणून पाडले. Sharad Pawar



– पवारांचा सवाल

त्या संदर्भात शरद पवार आजच्या बारामतीतल्या पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य करतील असे वाटत होते. परंतु, प्रत्यक्षात त्यांनी तसे भाष्य करणे टाळले. पण सुनेत्रा पवार यांना संधी दिली त्यांचा शपथविधी झाला याबद्दल आनंद व्यक्त केला. पण त्याच वेळी देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीणीकरणाच्या चर्चेतच नव्हते, तर त्यांना माझ्याबद्दल बोलायचे अधिकारच काय??, असा सवाल करून पवारांनी विलीनीकरणाचा विषय देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात घातला.

– शरद पवारांची “डबल गेम”

अजित पवार हे भाजप प्रणित सत्ताधारी लोकशाही आघाडीत (NDA) राहूनच जर दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करणारा असते, तर त्यांनी मला निश्चित सांगितले असते त्याविषयी चर्चा झाली असती. परंतु अजित पवारांनी तसे मला काही सांगितले नव्हते. अजित पवार सत्ताधारी लोकशाही आघाडीतून बाहेर पडणार नव्हते. ते सत्ताधारी आघाडीत राहूनच जर दोन पक्षांचे विलीनीकरण करणार होते, तर त्याविषयी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची चर्चा करणे अपेक्षित होते, असे देवेंद्र फडणवीस चारच दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यानंतर सुद्धा शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना विलीनीकरणाच्या चर्चेवर बोलायचा अधिकार नसल्याचे भाष्य केले होते. त्यांनी आज पुन्हा तेच भाष्य केले.

पण पवारांच्या दोन भाष्यांमधला फरक असा, की पवारांनी आधी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी विषयी काही माहिती नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले होते. पण आज मात्र त्यांनी सुनेत्रा पवारांना संधी दिली, आनंद आहे, असे वक्तव्य केले. पण त्याचवेळी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबद्दल चर्चा करण्याचा फडणवीसांना अधिकार नाही, असा दावा केला. यातून पवारांनी बारामतीतून पुन्हा “डबल गेमच” केली.

Sharad Pawar double game from Baramati, happy over Sunetra Pawar’s DCM; but denies Devendra fadnavis authority

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात