विशेष प्रतिनिधी
नागपूर : Anil Deshmukh उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातानंतर राज्याच्या राजकारणात शोककळा पसरली असतानाच, आता बड्या नेत्यांच्या प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना एक महत्त्वाचा आणि मित्रत्वाचा सल्ला देणार असल्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. “अजित पवारांचा अपघात हा संशयास्पद असून, नितीन गडकरी यांनी आता छोट्या आणि खासगी विमानाने प्रवास करणे टाळावे. असे सांगणार आहे.” असे अनिल देशमुख म्हणालेत.Anil Deshmukh
अजित पवारांच्या निधनामुळे व्यथित झालेल्या अनिल देशमुखांनी सुरक्षेच्या कारणास्तव नितीन गडकरी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “अजित पवारांचा झालेला अपघात मनाला चटका लावणारा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जर मला कधी विमानतळावर भेटले, तर मी त्यांना नक्की सांगेन की, तुम्ही आता छोट्या आणि खासगी विमानाने प्रवास करू नका. अशा विमानांच्या सुरक्षेबाबत आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.”Anil Deshmukh
धुकं होतं तर व्हिडीओ आलाच कसा?
अजित पवारांच्या विमान अपघाताच्या कारणांवर भाष्य करताना अनिल देशमुखांनी प्रशासनाच्या ‘धुकं’ असल्याच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बारामती विमानतळावर धुकं असल्याने धावपट्टी दिसली नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, अपघाताचा जो व्हिडीओ समोर आला आहे, तो खूप लांबून काढलेला आहे. व्हिडीओमध्ये विमान हवेतच तिरके झाल्याचे दिसते. त्यामुळे केवळ धुक्यामुळे हा अपघात झाला आहे, यावर कोणाचाही विश्वास नाही. जर खरंच तिथे दाट धुकं असतं, तर इतक्या लांबून व्हिडीओ काढणं शक्य होतं का? असा सवाल अनिल देशमुख यांनी उपस्थित केला.
या कारणांमुळेच, केवळ डीजीसीएची (DGCA) चौकशी पुरेशी नसून उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती नेमून या प्रकरणाचा छडा लावावा, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.
दोन्ही NCPच्या विलीनीकरणाबाबत मोठा गौप्यस्फोट
अनिल देशमुख यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरही स्फोटक माहिती दिली. “विलीनीकरणाच्या चर्चा हवेत नाहीत. आतापर्यंत दोन्ही गटांच्या १४ बैठका झाल्या आहेत आणि त्यातील काही बैठकांना मी स्वतः उपस्थित होतो. कोणत्या बैठकीत काय ठरलं आणि कोण हजर होतं, याची सर्व माहिती अजितदादांचा दुखवटा संपल्यानंतर आम्ही पुराव्यानिशी जाहीर करू,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App