वृत्तसंस्था
ढाका : Pakistan ऑक्टोबर २०२४ मध्ये पाकिस्तानचे जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष जनरल साहिर शामशाद मिर्झा यांनी बांगलादेशच्या लष्करप्रमुखांची भेट घेतली.संयुक्त प्रशिक्षण, तंत्रज्ञान हस्तांतरणावर चर्चा केली. ऑक्टोबर २०२५ मध्ये डीजी जॉइंट स्टाफ लेफ्टनंट जनरल तबस्सुम हबीब यांनी चार दिवसांच्या भेटीसाठी ढाका येथे भेट दिली. नोव्हेंबर २०२५ मध्ये पाकिस्तानी युद्धनौका पीएनएस सैफ चटगाव येथे पोहोचले होते.Pakistan
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या तख्तपालटानंतर गेल्या वर्षभरात पाकिस्तान बांगलादेशमध्ये आपला संरक्षण हस्तक्षेप वेगाने वाढवत आहे. अलीकडेच पाकिस्तानी संरक्षण कंपनी हेवी इंडस्ट्रीज टॅक्सलाने (एचआयटी) बांगलादेश सैन्यासाठी ४० रणगाडे अद्ययावत करण्याचा प्रस्ताव दिला आहे. हे रणगाडे पाकिस्तानच्या “हैदर” मॉडेलसारखे असतील. त्यात नवीन १२५ मिमी तोफा, मजबूत कंपोझिट आर्मर आणि टार्गेटिंग सिस्टम असतील.Pakistan
सूत्रांनुसार पाकिस्तान बांगलादेशला “अब्दाली” बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हस्तांतरित करण्याचा विचार करत आहे. ते १८० किमी पर्यंत मारा करू शकते.नोव्हेंबर 2025 मध्ये एचआयटीचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल शाकिर उल्लाह खट्टक यांच्या ढाका भेटीमुळे या सहकार्याला नवीन चालना मिळाली. त्यांनी बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांची भेट घेतली . टँक अपग्रेड, सशस्त्र वाहने आणि संयुक्त उत्पादन यावर चर्चा केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App