विशेष प्रतिनिधी
डहाणू : Eknath Shinde शिवसेना पक्षाच्या वतीने डहाणू नगर परिषदेच्या प्रचारासाठी आज आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रचारभेत बोलताना डहाणूवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला. या सभेला डाहाणूकर नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.Shiv Sena in the field to break ego; Eknath Shinde’s Elgar in Dahanu campaign rally
डहाणू तालुका इतर तालुक्यांच्या तुलनेत मागास राहिला असला तरी आता विकासाच्या नवीन वाटेवर चालायला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारासोबतच ज्यांनी त्यांच्यासाठी अर्ज मागे घेतले त्यांचेही आभार मानून पक्ष तुमचा नक्की विचार करेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून सांगितले.Eknath Shinde
डहाणूला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच येथील एकाधिकारशाही आणि अहंकार मोडून काढण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. डहाणूतील उद्योग वाढवण्यास प्राधान्य देऊ, स्थानिक मच्छीमारांचे प्रश्न सोडवू, जुन्या घरांचे प्रश्न मार्गी लावू तसेच शहरासाठी युनिफाइड डीसीपीआरला मंजुरी देऊ, शहरात नवीन उद्यानं विकसित करू, आपला दवाखाना सुरू करू, नगर परिषदेच्या इमारतीला निधी देऊ, प्रदूषणमुक्त उद्योग धोरण राबवू, स्थानिकांना रोजगार देण्यासाठी रोजगार निर्मितीला प्राधान्य देऊ, अशी ग्वाही याप्रसंगी दिली.
यावेळी पालघरचे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, माजी आमदार अमित घोडा, शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र माच्छी तसेच पक्षाचे सर्व उमेदवार, पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App