अहमदाबादेत विमान अपघातामधील जखमींची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट.
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद – PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. विमान अपघातातील जखमींवर येथे उपचार सुरू आहेत. पंतप्रधान मोदींनी जखमींची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांकडून रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधान मोदींनी रुग्णालयाच्या सी७ वॉर्डला भेट दिली, जिथे जखमींवर उपचार सुरू आहेत.PM Modi
अहमदाबादमधील विमान अपघाताने आपण सर्वजण स्तब्ध आहोत. इतक्या लोकांचा अचानक आणि हृदयद्रावक मृत्यू शब्दात वर्णन न करता येण्यासारखा आहे. सर्व शोकग्रस्त कुटुंबांसोबत आमच्या संवेदना आहेत. आम्हाला त्यांचे दुःख समजते आणि हे देखील माहित आहे की निर्माण झालेली पोकळी पुढील अनेक वर्षे जाणवेल. ओम शांती
त्याचवेळी, पंतप्रधानांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की, आज अहमदाबादमधील अपघातस्थळाला भेट दिली. विनाशाचे दृश्य दुःखद आहे. घटनेनंतर अथक परिश्रम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि पथकांना भेटलो. या अकल्पनीय दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत आमच्या संवेदना आहेत.
गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर (एआय १७१) विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले. या अपघातात विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला. विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाशी धडकले. या वसतिगृहात उपस्थित असलेल्या २० जणांनाही आपला जीव गमवावा लागला. या दुर्घनेत आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App