Donald Trump : ट्रम्प एवढे “उच्च मुत्सद्दी” आहेत की, भारत – पाकिस्तानच्या शस्त्रसंधीचे credit त्यांनी 13 वेळा घेतले, पण एलन मस्कशी आता ते एकदाही बोलायला नाहीत तयार!!

Donald Trump

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एवढे “उच्च दर्जाचे मुत्सद्दी” आहेत की, त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात न झालेल्या शस्त्रसंधीचे credit परस्पर 13 वेळा घेतले, पण आता ते एलन मस्क याच्याशी एकदाही बोलायला तयार नाही!! Donald Trump

वास्तविक जगात असा एकही वादविवाद आणि समस्या नाही की जो चर्चेमधून सुटू शकत नाही, असे जागतिक कीर्तीचे मुत्सद्दी मानतात. त्या चर्चेमध्ये अडथळे असू शकतात. वादविवाद आणि समस्याही मोठ्या असू शकतात, पण समस्या सोडवण्यासाठी चर्चेशिवाय दुसरा खऱ्या पर्याय असू शकत नाही असे मानले जाते. Donald Trump

पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुत्सद्देगिरीच्या व्याख्येत इतर देशांच्या बाह्य आणि अंतर्गत बाबीत लुडबुड करणे बसते, पण आपल्याच मित्राशी चर्चा आणि संवाद या गोष्ट बसत नाहीत, म्हणूनच त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात परस्पर लुडबुडी चर्चा केली, पण ते एलन मस्क याच्याशी बोलायला तयार नाहीत.



वास्तविक भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्षात ज्यावेळी भारताने पाकिस्तानातल्या अण्वस्त्रांना धक्का लावला, त्यावेळी पाकिस्तान डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे धावला. त्यांना भारताने शस्त्रसंधी करावी ही गळ घालायला विनंती केली. भारताने ट्रम्प यांच्याकडे तशी कुठलीच विनंती वगैरे काही केली नव्हती. पण भारताने पाकिस्तानातल्या अण्वस्त्रांना धक्का लावल्यानंतर अमेरिकेचे “हितसंबंध” दुखावले. म्हणून ट्रम्प यांनी परस्पर शस्त्रसंधीची घोषणा करून “मेख” मारून ठेवली. तशी “मेख” त्यांनी रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धातही मारायचा प्रयत्न केला, पण रशियावरच्या हल्ल्याचा बदला आम्ही घेणारच, असे पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावले आणि त्यानुसार युक्रेनवर त्यांनी हल्ला केलाच.

आंतरराष्ट्रीय पातळीवर लुडबुड करणे हीच खरी मुत्सद्देगिरी आहे असे मानणाऱ्या ट्रम्प यांच्यावर एलन मस्क यांनी असा काही घणाघाती वार केला की, तो ट्रम्प यांच्या वर्मावर बसला. एलन मस्क यांनी लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या Epstine file चे नाव घेतले आणि तिथेच ट्रम्प यांचा “काटा” मोडला. आपले सगळे “जुने रहस्य” बाहेर येण्याची भीती त्यांना वाटली. एलन मस्क याच्याशी आणखी पंगा घेतला किंवा आपण काही बोलून आणखी वाद वाढविला, तर तो आपल्याच गळ्याशी येईल, याची खरी जाणीव ट्रम्प यांना झाली. त्यामुळे त्यांनी एलन मस्क याच्याशी बोलण्याचे नावच टाकून दिले.

– जागतिक लुडबुडवीर

वास्तविक ट्रम्प यांची दुसऱ्या टर्म मधली आत्तापर्यंतची बोलीभाषा आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरीची तर सोडाच, साधी सभ्यतेचीही मानण्याच्या लायकीची नव्हती. अमेरिकेचे tariff जगावर लादणे असो, अमेरिकेतल्या अंतर्गत प्रशासकीय सुधारणा असोत किंवा भारत – पाकिस्तान आणि रशिया – युक्रेन युद्ध हे मुद्दे असोत, या सगळ्या मुद्द्यांवर ट्रम्प यांनी केलेली वक्तव्ये, त्यात वापरलेली भाषा ही अतिशय उथळ आणि दर्जाहीन होती. अमेरिकेचा जागतिक वर्चस्वाचा दर्प त्यामध्ये होताच, पण तो आधीच्या अध्यक्षांच्या तुलनेमध्ये फारच पोरकट दर्जाचा होता. या सगळ्या कालावधीत कधी ट्रम्प अतिआक्रमक झालेले दिसले, तर कधी मवाळ झालेले दिसले. ट्रम्प यांची दोलायमान अवस्था जगासमोर आली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या न झालेल्या शस्त्रसंधीचे क्रेडिट ट्रम्प यांनी उथळपणे बोलून 13 वेळा घेतले, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदाही त्यांना प्रत्युत्तर न देऊन त्यांना कोलले तरी ट्रम्प सुधारले नाहीत. पंतप्रधान मोदी नावाचे मित्र आपल्याला कोलतात, हे ट्रम्प यांच्या लक्षात आले नाही किंवा त्यांनी लक्षात येऊनही दुर्लक्ष केले. पण यातले काहीही असले तरी ट्रम्प यांनी 13 वेळा credit घेणे हे कुठल्याच निकषावर चांगल्या मुत्सद्देगिरीचे लक्षण नव्हतेच.

तर असले हे ट्रम्प “जागतिक लुडबुडवीर” म्हणून जगासमोर आले पण एलन मस्क, यांनी त्यांच्या वर्मावर बोट ठेवताच एकदम “गप्प” झाले. आत्तापर्यंत वेगवेगळी मदत करणाऱ्या मित्राशी बोलायचे नावही त्यांनी टाकून दिले.

Donald Trump poked his nose in world problems but not ready to talk with Elen Musk

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात