चिकन नेकचा गळा आवळायला निघालेल्या मोहम्मद युनूसवर बांगलादेशात राजीनाम्याची वेळ; त्या उलट पूर्व भारतात मोदी + अदानी + अंबानींची investment meet!!

चिकन नेकचा गळा आवळायला निघालेल्या नोबेल पुरस्कार विजेत्या मोहम्मद युनूस वर बांगलादेशात राजीनामा द्यायची वेळ आली, त्या उलट पूर्व भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांनी investment meet घेतली.

बांगलादेशात शेख हसीनांचे सरकार उलटवून सत्तेवर आलेल्या नोबेल पुरस्कार विजेत्या अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनुस वर वर्षभर व्हायच्या आत राजीनामा द्यायची वेळ आली. त्याच्या राजवटीचे कोणी ऐकेनासे झाले. तिथल्या राजकीय पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घालायच्या माता सुरू केल्या. मोहम्मद युनूसने शेख हसीना यांच्या आवामी लीग वर बंदी घातली. निवडणूक लढवण्यावर प्रतिबंध केला. पण त्याला आत्तापर्यंत पाठिंबा देणाऱ्या बांगलादेश नॅशनल पार्टी या सगळ्यात मोठ्या पक्षाने निवडणुकीवरच बहिष्कार घालायचा इशारा दिला. त्याच दरम्यान बांगलादेशचे लष्कर प्रमुख जनरल वकार उझ जमान यांनी मोहम्मद युनूसला डिसेंबर 2025 पर्यंत निवडणुका घेण्याची सक्ती केली. पण कुठल्याच राजकीय पक्षाने मोहम्मद युनूस याच्या नेतृत्वाखाली निवडणूक घ्यायलाच विरोध केला. बांगलादेशाचा निवडणूक आयोग निःपक्षपाती निवडणूक घेऊ शकणार नाही. सबब आम्हाला निवडणुकांमध्ये उतरता येणार नाही. बांगलादेशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना बदलून टाकावे, अशा मागण्या करून बांगलादेश नॅशनल पार्टीने मोहम्मद युनूस याच्यावर दबाव आणला.

या सगळ्या बाबींना वैतागून मोहम्मद युनूसने राजीनामा द्यायची तयारी केली. बांगलादेशातल्या विद्यार्थी आंदोलनातून निर्माण झालेल्या नॅशनॅलिस्ट सिटीजन पार्टीचा नेता नाहिद इस्लाम मोहम्मद युनूसला भेटायला गेला होता. त्यावेळी त्याने वैतागून राजीनामा द्यायची बात केली. कोणत्याच राजकीय पक्ष आपल्या राजवटीचे काहीच म्हणणे ऐकत नाही अशा स्थितीमध्ये सत्तेवर राहण्यात काही मतलब नाही, असे मोहम्मद युनूस म्हणाल्याचे नाहिद इस्लामने जाहीरपणे सांगितले. उलट सगळे राजकीय पक्ष हळूहळू एक होऊन तुम्हाला पाठिंबा देतील अशा शब्दांमध्ये आपणच त्यांची समजूत काढल्याचे नाहिद इस्लाम म्हणाला.

हा तोच मोहम्मद युनूस आहे, जो चीनमध्ये गेल्यानंतर बंगालच्या उपसागराचा “पालक” आणि “मालक” एकटा बांगलादेशच आहे. कारण भारताची पूर्व बॉर्डर land-locked आहे, असे म्हणाला होता. भारत आणि बांगलादेश सीमेवरील चिकन नेकचा गळा आवळून भारतापासून पूर्व भारत तोडायच्या बाता मारल्या होत्या. या मोहम्मद युनूसने चीन दौरा केला, त्यावेळी भारतातल्या काही लिबरल पत्रकारांनी भारतासमोर बांगलादेशाने फार मोठे आव्हान उभे केल्याचे चित्र निर्माण केले होते. पण प्रत्यक्षात मोहम्मद युनूसच्या चीन दौऱ्याला दोन महिने देखील उलटून गेले नाहीत, तोच बांगलादेशातल्या सगळ्या राजकीय अस्थिर परिस्थितीने त्याला घेरले आणि त्याच्यावर राजीनामा द्यायची वेळ आली.

North East investment meet

पण त्याच वेळी याच राजकीय मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व भारतामध्ये मोठी गुंतवणूक परिषद घेतली. या गुंतवणूक परिषदेमध्ये मुकेश अंबानी, गौतम अदानी, अनिल अगरवाल यांच्यासारखे भारतातले आणि परदेशातले मोठे उद्योगपती हजर राहिले. गौतम अदानी यांनी पूर्व भारतामध्ये एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. मुकेश अंबानी आणि अनिल अगरवाल यांनी देखील अशा स्वरूपाच्या घोषणा केल्या. पूर्व भारताला पूर्वी Frontier province म्हटले जायचे, पण आता इथे गुंतवणूक आणि उद्योग वाढल्यानंतर front runner province म्हटले जाईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

बांगलादेशाचा “अतिविद्वान” नोबेल पुरस्कार विजेता अर्थतज्ञ मोहम्मद युनूस यांनी ज्या चिकन नेकचा गळा आवळायच्या बाता मारल्या, तो सत्तेवर येऊन वर्षभर व्हायच्या आत वैतागला. चिकन नेकचा गळा आवळायचे सोडून सत्तेपासून दूर पळायचा प्रयत्न करू लागला. मात्र, त्याच वेळी पंतप्रधान मोदींनी कुठलीही प्रतिक्रिया न व्यक्त करता पूर्व भारतात investment meet घेऊन बांगलादेशासह चीनला तडाखेबंद प्रत्युत्तर दिले!!

Mohammed Younus in big trouble in Bangladesh; North East rising meet in Assam

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात