राष्ट्रवादीत अस्वस्थ असलेल्या जयंत पाटलांना बाहेर बोलायची झाली चोरी; बारामतीत जाऊन स्वतःच दिली कबुली!!

Jayanta Patil

विशेष प्रतिनिधी

पुणे : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थ असलेल्या जयंत पाटलांना बाहेर बोलायची झाली चोरी बारामतीत जाऊन स्वतः दिली कबुली!!, असे आज बारामतीत घडले.Jayanta Patil claims he has no unrest in Sharad Pawar NCP

शक्तीपीठ महामार्गाबाबत राजू शेट्टींनी आयोजित केलेल्या आंदोलनात जयंत पाटलांचे भाषण झाले होते. त्यावेळी त्यांनी माझी काही गॅरेंटी नाही घेऊ नका, पण शक्तीपीठ महामार्गाचे आंदोलन राजू शेट्टींच्या हातात असल्याने तुम्ही त्यांच्या पाठीशी ठाम राहा, असे जयंत पाटलांनी आंदोलन शेतकऱ्यांना सांगितले होते. परंतु त्याच दरम्यान अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे एक वक्तव्य समोर आले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील अस्वस्थ आहेत. पुढची पाच वर्ष विरोधकांमध्ये कशी काढायची याची त्यांना चिंता लागून राहिली आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले त्यामुळे जयंत पाटलांच्या राजकीय भूमिकेविषयी संशय अधिक गहिरा झाला.



त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटलांची भेट घेऊन त्यांच्याशी एक तास चर्चा केली. जयंत पाटील आज बारामतीत पोहोचले. तिथे त्यांनी कृषी प्रदर्शन अशी संबंधित असलेल्या गोष्टींची पाहणी केली. शरद पवारही तिथे हजर होते. त्यानंतर पत्रकारांची बोलताना खुलासा केला. मी राष्ट्रवादीत अस्वस्थ वगैरे काही नाही. आम्ही शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करतो. जो काही निर्णय घेऊ तो पक्षाचा हिताचा घेऊ पण सध्याच्या वातावरणात मला बाहेर बोलायची चोरी झाली आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

कुठल्याही महामार्गासाठी सरकारने भरपाईची रक्कम वाढवली की शेतकरी भरपाई घेऊन मोकळे होतात आणि जमिनी देऊन टाकतात. त्या संदर्भात मी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातल्या आंदोलनात बोललो होतो. तेव्हा मी माझी गॅरंटी घेऊ नका, असे म्हटलो होतो, पण राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आंदोलन सुरू ठेवा असेच शेतकऱ्यांना सांगितले होते अशी पुस्ती जयंत पाटील यांनी जोडली.

Jayanta Patil claims he has no unrest in Sharad Pawar NCP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात