विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chitra Wagh कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण माणुसकीला काळिमा फासणारे आणि संतापजनक आहे. विकृत लांडग्यांना ठेचून काढण्याची गरज आहे असा संताप आमदार चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.Chitra Wagh
कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका परिसरातून बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी कल्याण क्राईम ब्रांचने गुंड विशाल गवळी याला बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमधून अटक केली. या गुन्ह्यात त्याला मदत करणाऱ्या पत्नीला कल्याणमधील घरातून ताब्यात घेण्यात आले.
या बाबत बोलताना वाघ म्हणाल्या, या नराधमाला फाशीच होणार आहे.आम्ही सर्वजण त्या परिवारासोबत आहोत. या कुटुंबाची भेट घेतली. शक्य असतं तर त्या नराधमाचा चौरंगा केला असता. पण ते शक्य नाही. त्यामुळे संविधानाच्या माध्यमातून त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ घटनेवर लक्ष ठेऊन आहेत.
मुलीला वाचवू शकलो नाही याचं दुःख आहे, पण आम्ही पीडित कुटुंबासोबत आहे असे सांगून वाघ म्हणाल्या, विकृत लांडग्यांना ठेचून काढण्याची गरज आहे. यांची विकृती मोडून काढल्याशिवाय राज्य सरकार आणि देवा भाऊ गप्प बसणार नाहीत. मागच्या वर्षीच पॉक्सोच्या गुन्ह्यात या आरोपीला बेल मिळाली होती, त्याला मनोरुग्ण असल्याचे सर्टफिकेट न्यायालयात दाखवले होते आणि सुटला होता मात्र आता तसं होऊ देणार नाही.
बहीण आणि त्यांच्या मुलींच्या संरक्षणासाठी देवाभाऊ दिवस रात्र काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस पीडित कुटुंबाला न्याय देतील. संविधानाच्या चौकटीत राहून या आरोपीला फाशीची शिक्षा होणार आहे. दिन भर गये है, देवा भाऊ आले आहेत, एकालाही सोडलं जाणार नाही. एक तासात गुन्हा नोंदवला गेला आणि काही तासात आरोपी पर्यंत पोलीस पोहचले, असे त्या म्हणाल्या.
वाघ म्हणाल्या, – हा सामाजिक प्रश्न अतिशय गंभीर आहे. आपल्या राज्यातील बहिणी आणि त्यांच्या मुली सुरक्षित रहाव्यात यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सर्वांचा मोठा बाप देवा भाऊ आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मनोरुग्णचा सर्टफिकेट देण्याऱ्या डॉक्टरचा देखील शोध घेतला जाईल. त्याबाबत देखील अधिक तपास केला जाईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App