CWC : बेळगाव काँग्रेस शताब्दी अधिवेशनावर नकाशाच्या वादाची छाया, शिवाय आजारपणामुळे सोनिया + प्रियांका घरीच थांबल्या!!

CWC

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बेळगाव काँग्रेस शताब्दी अधिवेशनावर नकाशाच्या वादाची छाया, शिवाय सोनिया गांधींच्या आजारपणामुळे सोनिया आणि प्रियांका गांधी घरातच थांबल्या, अशा बातम्या आज समोर आल्या.CWC : Belgaum Congress centenary session overshadowed by map controversy, moreover Sonia + Priyanka stayed at home due to illness!!

सन 1924 मध्ये महात्मा गांधींनी काँग्रेसचे अध्यक्ष पद भूषविले होते. ते अधिवेशन बेळगावला झाले होते. त्या ऐतिहासिक अधिवेशनाची शताब्दी काँग्रेस आज आणि उद्या साजरी करत आहे. या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी हजर राहिलेत. पण आजारपणामुळे सोनिया गांधी हजर राहिल्या नाहीत. त्यांची देखभाल करायला खासदार प्रियांका गांधी घरीच थांबल्याने त्या पण बेळगावला गेल्या नाहीत.



 

पण त्या पलीकडे जाऊन एकूणच गांधी अध्यक्ष पद शताब्दी अधिवेशन वादग्रस्त राहिले काँग्रेसने या अधिवेशनाच्या पोस्टरवर भारताचा चुकीचा नकाशा छापला. संपूर्ण जम्मू काश्मीर भारताचा भाग असताना पाकिस्तानने बळकावलेला पाकिस्तान प्राप्त काश्मीर या नकाशातून काढून टाकला. त्याचे पडसाद सोशल मीडिया वर उमटले. अनेकांनी काँग्रेसला ट्रोल केले. काँग्रेसवर तोंडसुख घेण्याची संधी भाजपला मिळाली. काँग्रेसची मानसिकता देश विभाजनाची राहिली होती. आता तर ती थेट दुसरी मुस्लिम लीग झाली आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केला.

काँग्रेस एकीकडे बेळगाव शताब्दी अधिवेशनाची तयारी करत असताना दुसरीकडे कर्नाटक प्रदेश भाजपने कायम हे डुप्लिकेट काँग्रेसचे अधिवेशन आहे, कारण महात्मा गांधीच्या ज्या काँग्रेसचे अध्यक्ष होते, ती काँग्रेस आता शिल्लकच नाही. हे इंदिरा काँग्रेसचे अधिवेशन आहे, या काँग्रेसची स्थापना महात्मा गांधींनी नव्हे तर खोट्या गांधींनी म्हणजे इंदिरा गांधींनी केली होती, अशा शब्दात खिल्ली उडवली.

दरम्यान बेळगाव मध्ये आज ध्वजारोहण करून काँग्रेसने अधिवेशनाची सुरुवात केली. आज पहिल्या दिवशी काँग्रेस कार्यकरिणीची
CWC बैठक होत असून उद्या जय गांधी, जय भीम, जय संविधान रॅली होणार आहे.

CWC : Belgaum Congress centenary session overshadowed by map controversy, moreover Sonia + Priyanka stayed at home due to illness!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात