“याला” म्हणतात, INDI आघाडी; सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेसलाच “झाडू”न टाकण्याची तयारी!!

NDI Alliance

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : “याला” म्हणतात, INDI आघाडी; सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेसलाच झाडून टाकण्याची तयारी!!, असे म्हणायची वेळ काँग्रेस आणि झाडूवाल्या आम आदमी पार्टीच्या नेत्यांच्या भांडणांनी आणली आहे.INDI Alliance; Preparing to sweep the biggest party Congress!

दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हाताचा पंजा विरुद्ध झाडू हा संघर्ष एवढा टोकाला पोहोचला आहे की काँग्रेसच्या नेत्यांनी अरविंद केजरीवालांना देशद्रोही म्हटल्याबरोबर काँग्रेसलाच INDI आघाडीतून झाडून टाकायची मागणी आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी केली.



दिल्लीत अरविंद केजरीवालांनी त्यांची लाडकी बहिणी योजना सुरू केली, पण तशी कोणती योजना सुरूच नसल्याचा खुलासा दिल्लीतल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केल्यानंतर केजरीवालांची चडफड झाली. त्यातच काँग्रेस नेते अजय माकन यांनी केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांचे वाभाडे काढले. काँग्रेसने आम आदमी पार्टीविरुद्ध श्वेत पत्र काढले. केजरीवाल खोट्या योजना आणून दिल्लीच्या जनतेला फसवतात. ते देशविरोधी असल्याचा आरोप अजय माकन यांनी केला.

अजय माकन यांच्या आरोपांमुळे आम आदमी पार्टीच्या नेते भडकले. मुख्यमंत्री आतिशी मार्लेना आणि राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर तोंडसुख घेतले. काँग्रेसने अजय माकन यांच्यावर 24 तासांत कारवाई करावी, नाहीतर काँग्रेसलाच INDI आघाडीतून बाहेर काढावे, अशी मागणी संजय सिंग यांनी आघाडीतल्या बाकीच्या घटक पक्षांकडे केली. त्यामुळे INDI आघाडीत नेतृत्व बदलाच्या मागणीपाठोपाठ थेट काँग्रेसलाच आघाडीतून झाडून टाकण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. INDI आघाडीच्या एकजुटीला आणखी मोठा तडा गेला.

INDI Alliance; Preparing to sweep the biggest party Congress!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात