विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप साठी जिल्हा युनिटला “निर्णायक” महत्त्व प्राप्त झाले असून पक्षाच्या शिस्तीच्या चौकटीत राहून जिल्हा युनिट जे निर्णय करतील ते प्रदेश पातळीवरच्या समितीला मान्य होतील, असे सूचक वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. यातून भाजपची स्ट्रॅटेजी त्यांनी स्पष्ट केली. मोठ्या महापालिका निवडणुकांसाठी काही वेगळे निकष लावून महायुती पुढे सरकण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विशेषतः जिल्हा परिषद आणि क वर्ग ड वर्ग महापालिका यांच्यासाठी भाजपने जिल्हा युनिटना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे पक्षाच्या शिस्तीच्या चौकटीत राहून जिल्हा युनिट जे निर्णय घेतील, ते सर्वसाधारणपणे मान्य करण्याचे भाजपने ठरविले आहे यामध्ये स्थानिक पातळीवर आघाड्या महायुतीतल्या घटक पक्षांबरोबरची युती किंवा स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी असे निर्णय जिल्हा युनिट घेऊ शकतात.
छगन भुजबळ ते अभयसिंहराजे भोसले; राष्ट्रवादीतल्या खच्चीकरणाचे किस्से, त्यांच्याच नेत्यांनी चव्हाट्यावर आणले!!
परंतु मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यासारख्या मोठ्या महापालिकांच्या बाबत महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करून मगच प्रदेश पातळीवर निर्णय होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोल्हापूर सारख्या महापालिका मध्ये स्थानिक आघाडीला देखील भाजप महत्त्व देण्याची दाट शक्यता आहे.
पण कोणत्याही स्थितीत काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना यांना महाराष्ट्रातल्या कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फारसे महत्त्व राहता कामा नये, याची दखल घेण्यासाठी भाजप विचारपूर्वक पावले टाकणार आहे. त्यासाठीच मोठ्या आणि मध्यम महापालिकांसाठी काही वेगळे निकष लावून भाजप महायुतीतूनच निवडणूक लढण्याची तयारी करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App