London : लंडनमधील अमेरिकन दूतावासाबाहेर भीषण स्फोट

US embassy

पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : London इंग्लंडची राजधानी लंडनमधील अमेरिकन दूतावासाबाहेर स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या भीषण स्फोटानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असल्याचे सांगण्यात येत आहे. लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनी या स्फोटाला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य लंडनमध्ये असलेल्या अमेरिकन दूतावासाजवळ हा स्फोट झाला.London

स्फोटानंतर अधिकाऱ्यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक निवेदन जारी केले. ज्यामध्ये मेट्रोपॉलिटन पोलिसांनी लिहिले की, “आम्हाला नाइन एल्म्समधील यूएस दूतावासाच्या आसपासच्या घटनेची माहिती ऑनलाइन मिळाली. यानंतर खबरदारी म्हणून संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली. सध्या अधिकारी संशयित पॅकेजची चौकशी करत आहेत.”



मेट्रोपॉलिटन पोलिसांना संशयास्पद पॅकेज सापडल्यानंतर यूएस दूतावासाच्या आसपासचा व्यस्त भाग बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर सर्वांना इमारतीबाहेर काढण्यात आले. मात्र, काही लोकांना सुमारे अर्धा तास इमारतीत ठेवले होते. सध्या अनेक कर्मचारी इमारतीतच असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेनंतर, यूएस दूतावासाने आपल्या अधिकृत X हँडलवर सांगितले की, ‘स्थानिक अधिकारी लंडनमधील यूएस दूतावासाबाहेर संशयास्पद पॅकेजची चौकशी करत आहेत. जेथे मेट पोलिसही उपस्थित होते. खबरदारी म्हणून पोंटन रोड बंद करण्यात आला आहे. दूतावासाला पोलिसांनी वेढा घातला आहे, तर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

Massive explosion outside US embassy in London

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात