Vote Jihad : किरीट सोमय्या यांनी मौलाना नोमानी यांची ECI कडे केली तक्रार

Kirit Somaiya

‘भाजप समर्थकांचे करत आहेत बहिष्काराचे आवाहन करत आहेत’


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :Kirit Somaiya  किरीट सोमय्या यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्र लिहून मौलाना खलीलुर रहमान सज्जाद नोमानी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. नोमानी द्वेषपूर्ण भाषणे देत असून मुस्लिमांना भाजप समर्थकांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी व्होट जिहादचे आवाहनही ते करत असल्याचा आरोप केला आहे. यावर नोमानी यांनीही सफाई दिली आहे.Kirit Somaiya

किरीट सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, “मौलाना यांनी आपल्या भाषणात भाजपला मतदान करणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. हे भाषण सोशल मीडियावर फिरत आहे. ” किरीट सोमय्या यांनी व्हिडिओची लिंकही निवडणूक आयोगाला शेअर केली आहे.



एका व्हिडीओमध्ये नोमानी ‘तुमच्या भागातील कोणी जुलमी व्यक्तीचे समर्थन करत असेल तर त्याच्यावर बहिष्कार टाका’ असे म्हणताना ऐकू येत आहे. मला माहीत आहे की तुमच्या काही लोकांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता. अशा लोकांचे हुक्का पाणी बंद झाले पाहिजे. अशा लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे. अशा लोकांशी बोलणं चालणं बंद केलं पाहिजेत.

भाजपच्या आरोपानंतर नोमानी यांनी आपल्या स्पष्टीकरणात आपल्यावर केलेले आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. अनेक उमेदवारांना भेटण्याची संधी मिळाली. ते माझ्याकडे येत आहेत, आम्ही ठराव घेऊन काही लोकांकडून लेखी ठराव घेतला आहे. मग आम्ही यादी तयार केली. त्यामुळे हे व्होट जिहाद आहे आणि मुस्लिमांना हिंदूंच्या विरोधात एकत्र केले जात आहे, अशी भूमिका देणे म्हणजे पूर्ण खोटे आहे.

Kirit Somaiya files complaint against Maulana Nomani with ECI

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात