विशेष प्रतिनिधी
सातारा : Sharad Pawar ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनी जाहीरपणे मुस्लिमांना व्होट जिहादचे आवाहन करून शरद पवार + उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या तिघांच्या महाविकास आघाडीला मतदान करायचे आवाहन केले, तरी शरद पवारांनी व्होट जिहादचा आरोप मौलाना सज्जाद नोमानी यांच्यावर लावला नाही, तर तो आरोप त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मढवला.Sharad Pawar
साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरच व्होट जिहाद हा शब्द पहिल्यांदी वापरल्याचा आरोप केला. शरद पवार म्हणाले, व्होट जिहाद हा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी काढला. इतर कुणी काढला नाही. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्होट जिहाद हा शब्द पहिल्यांदा वापरून महाराष्ट्रातले वातावरण खराब करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मुस्लिम समाजाने लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान केले म्हणून त्यांनी व्होट जिहाद केला, असे म्हणता येणार नाही. पुण्यात काही ठिकाणी हिंदूंची संख्या जास्त आहे. तिथले लोक नियमितपणे भाजपलाच मतदान करतात. भाजपला आणि आम्हालाही त्याची सवय आहे, पण म्हणून काही आम्ही त्याला व्होट जिहाद म्हणत नाही. आम्ही त्याला धार्मिक रंग देत नाही. तिथली ती विचारधारा आहे, असे मानतो, अशी मखलाशी देखील पवारांनी केली.
बटेंगे तो कटेंगे हा विषय मात्र धार्मिक असल्याचा दावा शरद पवारांनी केला. भाजपला आपण सत्तेवर येत नाही याची खात्री झाल्यामुळे ते निवडणूक धार्मिक वळणावर नेऊ पाहत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सज्जाद नोमानींचा व्हिडिओ
त्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौलाना सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ ऐकवून त्यांनी मुसलमानांना व्होट जिहादचे आवाहन केल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले. इतकेच नाही, तर जे मुसलमान महायुतीला मतदान करतील, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्याचे आवाहन सज्जाद नोमानी यांनी केले. त्याचा फडणवीस यांनी तीव्र निषेध केला. परंतु, त्या विषयावर शरद पवारांनी कुठलेही भाष्य न करता अप्रत्यक्षपणे सज्जाद नोमानींचे समर्थन केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App