AIMIM – Shivsena विणूया अतूट नाती; घालूया विणलेली टोपी!!

AIMIM - Shivsena

विशेष प्रतिनिधी

मुंबई : AIMIM – Shivsena  भाजपचा पराभव करण्यासाठी कोणत्याही पातळीवर ठेवण्याचे तयारी असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आता असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलीस इत्तेहादूल मुसलमीन अर्थात AIMIM पक्षाशी देखील युती करायची तयारी दाखविली आहे.AIMIM – Shivsena

AIMIM चे नेते असदुद्दीन ओवेसी आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आधीच महाविकास आघाडीला विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रस्ताव दिलाच आहे. परंतु, त्या प्रस्तावात शिवसेनेचा थेट उल्लेख नाही. पण शिवसेनेला त्यांनी प्रस्ताव दिला तर त्यावर विचार करता येईल, असे उत्तर संजय राऊत यांनी दिले. रावतांच्या या उत्तरातूनच विणूया अतूट नाती; घालूया विणलेली टोपी!!, अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली.



अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी असदुद्दीन ओवैसी किंवा इम्तियाज जलील यांच्या प्रस्तावांना उत्तर दिलेले नाही. इम्तियाज जलील यांनी नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढवायचे देखील जाहीर केले. परंतु काँग्रेसने त्यांच्या या निर्णयावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्याचबरोबर त्यांच्या प्रस्तावाला सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिसाद देखील दिला नाही.

त्याउलट संजय राऊत यांनी मात्र AIMIM च्या नेत्यांनी शिवसेनेला आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला, तर त्यावर विचार करता येऊ शकेल, असे उत्तर दिले. आता काँग्रेस-राष्ट्रवादी या संदर्भात काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर ठाकरेंची शिवसेना आणि AIMIM यांची आघाडी झाली, तर एकनाथ शिंदे आणि भाजपच्या टीकेला धार येणार आहे.

AIMIM – shivsena UBT may make an alliance in maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात