Congress : काँग्रेसची “तडाखेबंद” रणनीती; आपापली राज्ये गमावलेल्या 3 माजी मुख्यमंत्र्यांवर सोपविली महाराष्ट्राची जबाबदारी!!

Congress

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्याबरोबर सर्व राजकीय पक्ष अलर्ट + ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी आपापल्या पद्धतीने रणनीती आखली आहे. काँग्रेसने देखील महाराष्ट्र काबीज करण्याच्या दृष्टीने “तडाखेबंद” रणनीती आखली असून आपापली राज्ये गमावलेल्या 3 माजी मुख्यमंत्र्यांवर महाराष्ट्राची विभागनिहाय जबाबदारी सोपविली आहे. अशोक गहलोत, चरणजीत सिंग चन्नी आणि भूपेश बघेल अशी या तीन माजी मुख्यमंत्र्यांची नावे असून त्यांना प्रत्येकी एक सहाय्यक देखील काँग्रेसने दिला आहे.

अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने राजस्थानची निवडणूक लढवली होती, पण तिथे काँग्रेसचे हरली. त्यानंतर हरियाणा विधानसभेची जबाबदारी काँग्रेसने गेहलोत यांच्यावरच सोपविली होती. पण तिथे देखील काँग्रेसला अपयश आले. आता महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे वेगवेगळे विभाग करून माजी मुख्यमंत्र्यांवर जी जबाबदारी काँग्रेसने सोपविली आहे, त्यामध्ये अशोक गेहलोत यांच्याकडे मुंबई आणि कोकण विभागाची जबाबदारी दिली असून त्यांना जी. परमेश्वरन हे साहाय्य करतील.


Sharad Pawar : शरद पवार यांची स्पष्टोक्ती, 90 वर्षांचा झालो तरी महाराष्ट्राला मीच योग्य रस्त्यावर आणणार, पक्षाची सूत्रे कुणालाही देणार नाही


पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी नेतृत्वाखाली काँग्रेसला आम आदमी पार्टी कडून पराभव स्वीकारावा लागला होता आणि छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा पराभव झाला होता. आता या दोन नेत्यांकडे काँग्रेसने महाराष्ट्रातल्या विदर्भा विभागाची जबाबदारी सोपविली असून त्यांना उमंग सिंघल हे साहाय्य करतील.

छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी. एस. सिंगदेव आणि कर्नाटकातले मंत्री एम. बी. पाटील यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपविली असून राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि तेलंगणा मधले नेते उत्तम कुमार रेड्डी यांच्यावर मराठवाड्याची जबाबदारी सोपविली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघाची जबाबदारी काँग्रेसने सईद नासीर हुसेन आणि डी. अनसुया सीताक्का या दोन नेत्यांकडे सोपविली आहे.

हे सगळे नेते आपला सर्व प्रकारच्या निवडणुकांचा अनुभव पणाला लावून महाराष्ट्रात काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.

Congress has given 3 former CMs responsibility of maharashtra who lost their states

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात