NCP SP : तुतारी आणि पिपाणी ही दोन स्वतंत्र चिन्हे, त्यांचा एकमेकांशी संबंध नाही; निवडणूक आयोगाने पवारांच्या पक्षाला ठणकवले!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तुतारी आणि पिपाणी ही दोन स्वतंत्र निवडणूक चिन्हे आहेत. त्यांचा एकमेकांशी संबंध जोडण्यात मतलब नाही. त्यामुळे पिपाणी हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाच्या यादीतून वगळण्याचे कारण नाही, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शरद पवारांच्या पक्षाला ठणकावले.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे पिपाणी चिन्हाविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने तुतारी वाजविणाऱ्या माणसाचे चिन्ह ठळक केले. मात्र पिपाणी चिन्ह निवडणूक आयोगाच्या यादीतून वगळून टाकायची मागणी मान्य केली नाही.

तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी हे दोन पूर्णपणे भिन्न आणि स्वतंत्र निवडणूक चिन्हे आहेत. त्यांचा एकमेकांशी संबंध जोडण्यात काहीच मतलब नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या यादीतून निपाणी चिन्ह वगळणार नाही, असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.

CEC rejects demand of NCP SP to remove trumpet election symbol

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात