विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad Pawar मराठी माध्यमांनी “चाणक्य” म्हणून गौरवलेल्या शरद पवारांनी अखेर “मोठ्ठा” डाव टाकला. सुप्रिया सुळेंच्या गाडीत फाईलीआड लपलेला नेता गळाला लावला!!Sharad Pawar
शरद पवारांनी आत्तापर्यंत ताटातले वाटीत घेत अजितदादांचे 4 – 5 आमदार तरी गळाला लावलेत. त्या पलीकडे जाऊन दुसऱ्या कुठल्याही पक्षातल्या आमदार खेचण्याची पवारांनी क्षमता दाखवली नाही. मात्र, अजितदादांच्या गोटातले आमदार आपल्याकडे खेचण्याच्या पवारांच्या प्रयत्नांचे वर्णन मराठी माध्यमांनी “पवारांनी डाव टाकला”, “पवारांनी चाणक्य खेळी” केली, असे भलामणी भाषेत केले.
असाच एक “मोठ्ठा” डाव पवारांनी टाकल्याची बातमी मराठी माध्यमांनी दिली आहे. शिंदखेडाचे अजितदादांच्या राष्ट्रवादीतले आमदार राजेंद्र शिंगणे यांना पवारांनी आपल्या पक्षात घेतल्याची ही बातमी आहे. हे तेच राजेंद्र शिंगणे आहेत, जे परवा खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीत बसून शरद पवारांच्या पुण्यातल्या “1 मोदी बाग” भेटायला गेले होते. मात्र, माध्यमांचे त्यांच्याकडे लक्ष जात असते त्यांनी एका फाईलीआड आपला चेहरा लपविला होता. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या गाडीत बसून शरद पवारांच्या भेटीला जाणारा नेता कोण आणि त्यांनी फाईलीच्या आड आपला चेहरा का दडविला होता??, याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू राहिली होती. अखेर ते राजेंद्र शिंगणे असल्याचे समोर आले.
शरद पवारांनी शिंदखेडा मतदारसंघात खूप मोठी कामे केल्याने आपण त्यांच्याबरोबर जाण्याचे सूतोवाच राजेंद्र शिंगणे यांनी केले होतेच. त्यानुसार ते पवारांना भेटायला गेले, पण माध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून त्यांनी स्वतःहून फाईलीच्या आड चेहरा लपविल्याने त्यांची चर्चा जास्त झाली. पवारांनी “मोठ्ठा” डाव टाकून या फाईलीआड लपलेल्या चेहऱ्याला आपल्या राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App