विशेष प्रतिनिधी
मुंबई : Manoj Jarange हरियाणा विधानसभेचे निकाल लागून काँग्रेसला अनपेक्षित धक्का बसल्याच्या पार्श्वभूमीवर “इंडी” आघाडीतले घटक पक्ष आणि त्यांचे चले चपाटेही हादरले. कारण हरियाणाच हिंदू मतदारांनी एकजूट दाखवत राहुल गांधींचा जात वर्चस्वाचा अजेंडा नाकारून काँग्रेसचा धुव्वा उडवला. त्यानंतर महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतही हरियाणा विधानसभेचे पडसाद उमटतील, अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू झाली. काँग्रेस सकट ठाकरे + पवारांना याचा कसा फटका बसेल याविषयी विश्लेषण सुरू झाले. ठाकरे – पवारांच्या पक्षांनी काँग्रेसला चिमटे काढले. Manoj Jarange said about election candidate
पण या सगळ्यांमध्ये मराठा आरक्षणाचे एकजातीय राजकारण करणारे मनोज जरांगे काही बोलले नव्हते. त्यांनी हरियाणातील निकालानंतर तब्बल 12 तासांनी डरकाळी फोडली. तुमचे सगळे पाडणार, अशी दमबाजी त्यांनी महायुतीला केली.
Narendra Modi : मोदी आज महाराष्ट्राला 7600 कोटींचे प्रकल्प भेट देणार
मनोज जरांगे म्हणाले :
हरियाणा विधानसभा निवडणुकीत जो फॅक्टर चालला, तो महाराष्ट्रात कसा चालेल??
फडणवीसांचे असेच आहे, त्यांना मराठा, जाट, शेतकरी आणि तिकडच्या अठरा पगड जातींनी मतदान केले आणि दिले का ढकलून. हे उपकार विसरणारे आहेत, एकदा जेवण झाले आणि मागून हात पुसले की हे मोकळे झाले.
यांना किती माया लावा हे असेच आहे. 106 आमदार निवडून दिले पण हे उपकार विसरले, झाले सुरू आमच्यात फूट पाडणे, इथे मराठ्यांचे वाटोळे झाले आहे, इथे आमच्या लेकरांचा प्रश्न आहे. राज्यात आमचा वेगळा प्रश्न आहे, इथे सोपे नाही, इथे एकटा मराठा 50 – 55 % आहे. ते गणित आम्हाला सांगायचे नाही आणि ते गणित जुळतही नाही. तुम्ही निवडून या आम्हाला काही गरज नाही, पण आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा.
आमचे डोळे उघडले आहेत, ज्यांचे डोळे उघडायचे नव्हते त्यांचे डोळे उघडले आहेत. जे राजकारणात आंधळे झाले होते त्यांचेही डोळे उघडले आहेत. जे आमचा पक्ष म्हणत होते, त्या पक्षातील मराठ्यांचेही डोळे उघडले आहेत. आमच्या डोळ्यात धूळ फेकून, करोडो मराठ्यांच्या अनादर आणि अपमान करून, आमच्या डोळ्यादेखत त्यांनी निर्णय घेतला आणि सहा प्रमाणपत्रावर आरक्षण मिळू शकते, तर आमच्या 57 लाख नोंदी सापडल्या आहेत. मग सरकार भेदभाव आणि जातीभेद का करत आहे??
त्यांनी मराठ्यांना खुन्नस दिली आहे आणि आता मराठे जागे झाले आहे. एकाचे करतो आणि एकाचे करत नाही. धनगर समाजाचा निर्णय घेतला त्याचे आम्ही स्वागत करतो, पण मग मराठ्यांवर अन्याय का??
कुणबी – मराठा एक कसा नाही, आणि कोणाला नाटक शिकवता?? भाजपामधील गोरगरीब मराठ्यांना कळते आपण इतकी हाडाचे काडं केली, रक्ताचे पाणी केले आणि यांना निवडून आले, ते एका जातीचा निर्णय घेतात, मग मराठ्यांचे कसे होत नाही, आम्ही तुम्हाला निवडून आले आहे. आमच्या लेकरांची वाटोळे करायला निवडून आले का?? याच्या साठी सत्ता हातात दिली का?? असा प्रश्न भाजपामधील मराठा विचारत आहे.
आता मराठा उसळला आहे आणि काल परवा धनगर समाज बाबतीत निर्णय झाला, तेव्हापासून मराठा खडबडून जागा झाला आहे. आता मराठा समाज एकत्र येणार आहे, आणि ही शक्ती तुम्हाला दिसणार आहे, आता जातवाण मराठा घरी थांबत नाही. जातवाण मराठा आता कोणाच्या मेळाव्याला जात नाही, आता मराठ्यांनी दंड थोपटले आहेत, आणि आता सगळे पडणार, तुम्ही किती शहाणे आहेत बघू आता!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App