विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यात देवेंद्र फडणवीस यांची मोलाची भूमिका आहे. यापूर्वी देखील ते मुख्यमंत्री असतांना त्यांनी मराठा समाजासाठी विविध योजना आणल्या. यावेळी देखील आमच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय एकमताने घेतला. यात फडणवीसांसह अजित पवार यांचा देखील मोठा सहभाग होता. त्यामुळे मराठा आरक्षणाला फडणवीसांचा विरोध आहे, असे म्हणणे चूकीचे आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी मांडत जरांगे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर आज राज्यभरातील महिलांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी राख्या पाठवल्या होत्या. तर मुंबईसह राज्यभरातील महिला भगिनी शिंदे यांना राखी बांधण्यासाठी वर्षा बंगल्यावर देखील दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी महिलांशी संवाद साधला.
आम्ही देणारे लोक, घेणारे नाही
मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, आमचे सरकार हे देना बॅंक आहे, देणारे आहे. तर विरोधक हे केवळ घेणारे लोक आहेत. विरोधकांनी सुरूवातीपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध केला. ते म्हणाले की, हे लोक पैसे देणार नाहीत, पण आम्ही ते दिले. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आता विरोधक महिलांना सांगत आहे की, पैसे काढून घ्या, नाहीतर सरकार पुन्हा वापस करून घेईल. पण विरोधकांना मी सांगू इच्छितो की, आम्ही माता भगिनींचा विचार करणारे लोक आहोत. या योजनेचे पैसे जशी जशी आमची ताकद वाढेल तशी त्याची रक्कम देखील वाढविण्याचा आमचा मानस आहे.
राज्याला आर्थिक चालना मिळेल
राज्यातील महिलांना या योजनेतून जे पैसे मिळाले आहे. त्याचा विनोयग कसा करायचा याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे बाजारपेठेत हे पैसे येतील आर्थिक चालना मिळण्यास यातून गती मिळेल, असेही शिंदे म्हणाले.
फडणवीसांवर आरोप करणं चूकीचे
फडणवीस हे मराठा आरक्षणात अडथळा आणतात, असा आरोप जरांगे यांनी केला. या आरोपावर देखील मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde म्हणाले की, कोणीही असा आरोप करणे चुकीचे आहे. मुळात विरोधक मराठा आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका घेतात. तर मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार आम्ही राज्यात नोंदी शोधण्याचे काम केले. अनेकांना त्याचा फायदा देखील झालेला आहे. मराठा समाजाला जे जे देता येईल यासाठी आम्ही काम केले. फडणवीस यांनी मोलाचा वाटा देत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून काम देखील केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App