विशेष प्रतिनधी
मुंबई : रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडून बालिशपणाची वक्तव्ये अपेक्षित नाही असा टाेला भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. जाे माेठा असताे, ताकदवर असताे, ताे नेहमी संयमी असताे असेही ते म्हणाले.
शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदम आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात गोवा मुंबई हायवेवरुन वाद सुरु आहे. राक्षसी महत्त्वाकांक्षा असेल तर युती तोडावी. तुमचं तुम्ही लढा आमचं आम्ही लढतो. प्रत्येक मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे, असं म्हणत रामदास कदम यांनी भाजपवर निशाणा साधला.याला उत्तर देताना प्रवीण दरेकर म्हणाले, महायुतीत सारा अलबेल आहे.
Kolkata rape : मृत्यूपूर्वी पीडितेला दिल्या जखमा, बलात्काराची पुष्टी, पण फ्रॅक्चर नाही; कोलकाता घटनेचा तपशीलवार पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर
आणखी अलबेल राहण्यासाठी जबाबदार नेत्यांना जबाबदारीने वागणे गरजेचं आहे. रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी जेष्ठत्वासारखं बोललं पाहिजे. बालिशपणाचे वक्तव्य त्यांच्याकडून अपेक्षित नाही. महायुती टिकण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षाच्या नेत्यांनी जबाबदारीने आणि संयमानं बोललं पाहिजे.
भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीची ताकद देशात आहे, महाराष्ट्रात आहे. जो मोठा असतो ताकदवर असतो तो नेहमी संयमी असतो. ज्याच्या मनगटात ताकद नसते त्याला आव आणून दाखवावा लागतो मी ताकदवर आहे. भारतीय जनता पार्टी महायुतीतच लढणार असल्याचेही दरेकर म्हणाले. लाडकी बहिण याेजनेबाबत दरेकर म्हणाले, लाडक्या बहिणीसाठी आम्ही मुंबईत झिरो बॅलन्स अकाउंट उघडले आहे. आत्तापर्यंत चाळी हजार अकाऊंटस उघडण्यात आली असून एक लाखाचे उद्दिष्ठ आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App