‘बायडेन यांनी मूक प्रेक्षक बनून राहू नये’ अशी मागणीही केली आहे
विशेष प्रतिनिधी
ह्युस्टन : बांगलादेशातील (Bangladesh )सत्ता परिवर्तनाच्या काळात हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे. हिंदूंना लक्ष्य करून हल्ले झाले असून त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांचेही नुकसान झाले आहे. बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांना लक्ष्य करणाऱ्या हल्ल्यांविरोधात अमेरिकेतही निदर्शने झाली आहेत
300 हून अधिक भारतीय-अमेरिकन आणि बांगलादेशी वंशाचे हिंदू ह्यूस्टनमधील शुगर लँड सिटी हॉलमध्ये जमले. आंदोलकांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आणि बांगलादेशातील असुरक्षित समुदायांचे संरक्षण करण्यासाठी त्वरित आणि निर्णायक पावले उचलण्याचे आवाहन केले.
हिंदू समुदायांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात झालेल्या वाढीमुळे या प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. निषेधाच्या आयोजकांनी बांगलादेशातील सर्व धार्मिक अल्पसंख्याकांच्या तात्काळ संरक्षणाची मागणी केली आणि बायडेन प्रशासनाला मानवतेविरुद्धच्या या घृणास्पद गुन्ह्यांकडे मूक प्रेक्षक बनून न राहण्याची विनंती केली. आंदोलकांनी बांगलादेशी हिंदूंना सतर्क राहण्यासाठी, ताज्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत एकत्रितपणे आवश्यक पावले उचलण्यास प्रोत्साहित केले.
‘ग्लोबल व्हॉईस फॉर बांगलादेश मायनॉरिटीज’ या संस्थेने ‘सेव्ह हिंदू इन बांगलादेश’ आंदोलन आयोजित केले होते. मैत्री, विश्व हिंदू परिषद (VHP), अमेरिका, हिंदूॲक्शन, हिंदूपॅक्ट, ह्यूस्टन दुर्गाबारी सोसायटी, इस्कॉन, ग्लोबल काश्मिरी पंडित डायस्पोरा आणि इतर अनेक गटांसह हॉस्टनमधील प्रमुख हिंदू गटांचे प्रतिनिधित्व करणारी ही आघाडीची संघटना आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App