राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना 14 ऑगस्टला जारी करण्यात येणार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी मतदान ( Elections ) जाहीर झाले आहे. निवडणूक आयोगाने बुधवारी राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणूक जाहीर केली. निवडणूक आयोगाने त्याची अधिसूचना जारी केली आहे. 3 सप्टेंबर रोजी 12 जागांसाठी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 26 आणि 27 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.
राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना 14 ऑगस्टला जारी करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. 21 ऑगस्ट ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. राज्यसभेच्या 12 पैकी 12 जागांसाठी 3 सप्टेंबरला निवडणूक होणार असून 3 सप्टेंबरलाच निकाल जाहीर होणार आहेत.
राज्यसभेत भाजपचा आकडा आता ९० च्या खाली गेला आहे. एनडीएकडे राज्यसभेत केवळ 101 जागा आहेत. या जागा बहुमताच्या तुलनेत खूपच कमी आहेत. राज्यसभेत सध्या 226 सदस्य आहेत. यामध्ये भाजप 86, काँग्रेस 26, टीएमसी 13, वायएसआरसीपी 11, आप 10 आणि द्रमुक 7 जागा आहेत. राज्यसभेचे 12 सदस्य राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App